आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 जून 2026
esakal June 04, 2026 10:45 AM

पंचांग -

गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ५.५८ सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय रात्री १०.३१, चंद्रास्त सकाळी ८.५९, भारतीय सौर ज्येष्ठ १४ शके १९४८.

दिनविशेष -

  • १९९७ - संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘इन्सॅट-२ डी’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोअरू अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण.

  • २०१५ - आशियाई मैदानी स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत भारताच्या एम. आर. पूवम्माला रौप्यपदक. हेप्टॅथलॉन प्रकारात लिक्‍सी जोसेफला रौप्यपदक.

  • २०१६ - अफगाणिस्तानातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘गाझी अमानुल्ला खान पुरस्कार’ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.