SANJAY DUTT MADHURI DIXIT REUNION: १९९३ मध्ये प्रसिद्ध झालेला सिनेमा खलनायक प्रचंड हिट झाला. त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा पुढील भाग 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या भागात सुद्धा हेच तीन कलाकार या भागात पहायला मिळण्याची शक्यता आहे.
या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ ही लोकप्रिय तिकडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याचे संकेत याबाबत जॅकी श्रॉफ यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिले आहेत. त्यांनी सांगितले, की 'संजय दत्तचा चित्रपटातील सहभाग जवळपास निश्चित असल्याचे दिसत आहे.'
तसेच त्यांच्या राम या व्यक्तिरेखेचा आणि त्याच्या पत्नीच्या भूमिकेचाही उल्लेख करत त्यांनी हसतच माधुरीच्या पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली; मात्र कथानक अद्याप त्यांच्या हातात आलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, माधुरी दीक्षित यांनीही सध्या तरी आपल्या भूमिकेबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या तिघांना पुन्हा एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा कायम असली तरी अंतिम निर्णयाची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे.
ना मुलांचा, ना नवऱ्याचा... अनुष्का शर्माच्या मोबाईलवर वॉलपेपर म्हणून आहे 'या' व्यक्तीचा फोटो; नेटकरीही झाले चकीत