महागडे स्कीनकेअर प्रोडक्ट वापरून चेहऱ्यावर चमक येत नाही. चेहरा कायम निस्तेज दिसतो. अशावेळी तुम्ही चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या सकाळच्या दिनचर्येत काही गोष्टी करायला हव्यात. आज आपण चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी सकाळी उठल्यावर काय करायला हवं हे जाणून घेऊयात,
पुरेसं पाणी
झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी किमान 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. या सवयीमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि त्वचेतील आर्द्रता टिकून राहते.
क्लींजरचा वापर
सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर उत्तम दर्जाचे क्लींजर चेहऱ्यासाठी वापरायला हवे. क्लींजरमुळे चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि रात्री तयार झालेले ऑइल काढता येते. तुम्ही नैसर्गिक क्लींजर म्हणून बेसन किंवा दह्याचा वापर करू शकता.
हेही वाचा – काळवंडलेल्या अंडरआर्म्ससाठी होममेड पेस्ट
मॉइश्चरायझर
चेहरा धुतल्यानंतर त्वचा कोरडी पडू देऊ नये. यासाठी तुम्ही त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायजर वापरू शकता. मॉइश्चरायजरमुळे त्वचा दिवसभर मऊ आणि टवटवीत राहते.
सनस्क्रीन
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असल्यास घरात असतानाही सनस्क्रीन वापरण्याची सवय लावा. याचा फायदा त्वचेला नक्कीच होतो.
आहार
आहाराता फळे, ड्राय फ्रूट्स किंवा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यातील पोषक घटक त्वचेला आतून पोषण देतात, ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा सुंदर दिसते.
हलकी मालिश
दररोज चेहरा धुताना हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि नैसर्गिक ग्लो येतो.
हेही वाचा – फाटला म्हणून फेकू नका मेकअप ब्लेंडर, या ट्रिक्समुळे पुन्हा येईल उपयोगी