पेट्रोलचे भाव चीन, पाकिस्तान, नेपाळमध्ये झाले कमी, भारतात कधी कमी होणार भाव? केंद्र सरकारने..
Tv9 Marathi June 04, 2026 01:45 PM

इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव सतत वाढताना दिसले. आता पुन्हा एकदा कच्चे तेल 100 डॉलरच्या खाली आले. ज्यामुळे जगात पेट्रोलच्या किमत कमी होऊन 147.90 प्रति लीटर वरून घसरून 145.99 वर आली. भारतात सरासरी किंमत पेट्रोल 108.21 रूपये प्रति लीटरवर स्थिर आहे. जागतिक बाजारात पेट्रोल किमत आकड्यांवरून जगभरात जवळपास 37.28 रूपयांनी स्वस्त झाले. भारताचे शेजारी देश चीन, नेपाळ, पाकिस्तान आणि म्यांमारमध्ये जूनमध्ये पेट्रोलच्या किमती कमी करण्यात आल्यात. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्याने सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोलच्या किमती कमी केल्या. मात्र, भारतात पेट्रोलच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आले नाही.

तब्बल 4 वेळा पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या किमतीबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. भूटान, श्रीलंका आणि भूटानमध्ये जागतिक बाजारत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही भाव वाढवण्यात आलीत. ग्लोबल पेट्रोल प्राईसच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये पेट्रोलची सरासरी किमती 139.41 रूपये प्रती लीटर होती. जी आता कमी करून 130.82 रूपये करण्यात आली.

चीनमध्येही पेट्रोलच्या किमती कमी झाल्या आहेत. चीनमध्ये पेट्रोलची किमत 133.47 होती आता ती कमी करून प्रती लीटर 132.81 करण्यात आली. नेपाळमध्ये पेट्रोलची किमत अगोदर 136.41 होती ती आता कमी करून 135.86 रूपये प्रति लीटर करण्यात आली भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी कधी होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, सध्याच भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणे कठीण आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात ज्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजारात वाढत होते, त्यावेळी निवडणुकीच्या कारनाने सरकारने स्थिर ठेवले होते. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील फोरम ट्रक्स कमी केला. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या. अगोदरच तेल कंपन्यांवर मोठा ताण आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारतात बघायला मिळत आहे. अनेक गोष्टींच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.