सुटलेलं , वाढलेलं पोट फक्त तुम्हाला बेढबच बनवत नाही. तर वाढलेलं पोट शारिरीक व्याधीही सोबत आणतं. यामुळे डॉक्टर वजन कमी करण्याचा सल्ला देतात. त्यासाठी व्यायाम, जीमला जावे लागते. पण जर तुम्हाला ते शक्य नसेल तर फक्त काही पेय पिऊनही तुम्ही वजनच नाही तर वाढलेलं पोटही कमी करु शकता.
कोणतं आहे हे ड्रिंक ते कसे बनवयाचे ते बघूया.
साहीत्य-चिया सीड्स- १ चमचा, पाणी- १ ग्लास,लिंबाचा रस १ चमचा, मध अर्धा चमचा.( आवडीनुसार)
कृती- अर्धा कप पाण्यात चिया सीड्स १० -१५ मिनिट भिजवा. ते काहीवेळात फुगून वर येईल. नंतर त्यात उरलेलं पाणी, लिंबाचा रस, आणि मध टाकून एकत्र करा. एक एक घोट प्या.
हे ड्रींक शक्यतो सकाळी उठल्यावर अनुशापोटी घ्यावे. त्यामुळे तुमचे सतत खाणे कमी होते. त्यासाठी काहीही खाण्याच्या ३० मिनिटाआधी हे ड्रींक घ्यावे.
पोट कसे कमी होते.
या ड्रींकमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. चिया सीड पाणी शोषूण घेते त्यामुळे फुगते. परिणामी पोट भरल्यासारखे वाटते. पचनक्रिया संथ होते. त्यामुळे सारखी भूक लागत नाही. शुगर कंट्रोलमध्ये राहते. शरीर थंड राहते. त्यामुळे सूज कमी उतरते. पोटाची चरबी कमी होते. भूक आणि इमोशनल ईटींग कंट्रोलमध्ये राहते. पचनक्रिया सुरळीत होते. त्वचाही उजळते.
मात्र हे ड्रींक घेताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. जसे की चिया सीड्स कोरड्या खावू नयेत. तसेच चिया सीड्स जास्त प्रमाणात घेतल्यास गॅस, पोट जड वाटणे, जुलाब यासारख्या समस्या उद्भवतात. ज्यांना ,गर्भवती महिला, बीपी, किंवा पाचनाशी संबंधित त्रास असेल अशांनी हे ड्रींक्स घेवू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ड्रींक्स घ्यावे.