Aaditya Thackeray press conference : गडचिरोलीमध्ये आपल्या आवडत्या उद्योगपतींना कामं दिली जात आहेत. मागच्या महिन्यात लोहा डोंगरी नावाची मायनिंग सुरु करणार होते. गडचिरोलीमध्ये प्रकल्प मीडियामध्ये येत नाही. गडचिरोलीमधील हेद्री आणि जवळपासच्या गावात मायनिंगचा प्रकल्प दिला जात असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. ही जागा प्रोटेक्टड टायगर कॉरिडॉअर मध्ये दिली जात आहे, टायगर कोरीडोअर हे रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे. त्यामुळं हा प्रकल्प रद्द करुन टायगर कॉरिडॉर करण्यात यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
28 एप्रिल 2026 PCCF श्रीनिवास रेड्डी जे आहेत त्यांना विचारलं गेलं की ही जमीन मायनिंग ला देऊ शकतो का? श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कोणाचा प्रेशर आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम (वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऍक्ट) मोडून जंगल हे काँक्ट्रॅकरच्या घश्यात घालत आहेत असे ठाकरे म्हणाले. मी भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिलं आहे की श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करावं. इथे हा मायनिंग प्रकल्प होऊ नये अशी मागणी केल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ताडोबा इंद्रावती च्या दरम्यान हा टायगर कोरीडोअर येतो. लोक म्हणतात महाराष्ट्र मध्ये टायगर पाहायचे असतील तर ताडोबाला जावा. पण तुम्ही अश्या प्रकारे टायगर कोरीडोअर वर मायनिंग परमिट घेताय, हा प्रकल्प मायनिंगचा ज्या भागात येतोय त्यासाठी नॅशनल टायगर ऑथॉरिटी कडे जावं लागेल असे ठाकरे म्हणाले. 13 मे 2026 चे पत्र PCCF ने लिहिलं आणि हा फ़ॉरेस्ट कोरिडोअर नाही असे सांगितले. म्हणजे एप्रिल मधलं पत्र आणि मे मधलं पत्र विरोधाभासी आहे. 1 महिन्यात त्यांना कळत एका रिपोर्ट नुसार की ही जागा टायगर कोरीडोअर नाही.
कॉक्रोच जनता पार्टीची मागणी काय आहे, तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही पण ज्या प्रकारे आम्ही सांगतोय की त्यांची मागणी बरोबर आहे याचा अर्थ काय? आमच्यातलं कोणी जाणार की नाही यापेक्षा सरकार घाबरलेला आहे की नाही हे बघा. जर घाबरलं नसेल तर अभिजीत दिपके त्यांना ते आंदोलन करु देतील असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे, गडचिरोली, पर्यावरण, शिवसेना, भाजप, सरकार, चंद्रपूर