निर्मात्यांवर केलेले शारीरिक छळाचे आरोप खोटे; लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने स्वतःच केलं कबूल; मनोरंजन विश्वात खळबळ; म्हणाली..
abp majha web team June 04, 2026 08:13 PM

Actress Shilpa Shinde Reveal Harrasement Allegations was Fake: टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जवळपास 10 वर्षांपूर्वी तिने ‘भाबी जी घर पर हैं’ (Bhabhiji Ghar Par Hai) या मालिकेचे निर्माता संजय कोहली (Sanjay Kohli) यांच्यावर छळाचे आरोप केले होते. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पाने हे आरोप खोटे असल्याचा खुलासा केला आहे. या प्रकरणानंतर ‘या अभिनेत्रीवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. इतकंच नव्हे तर तिच्या अटकेची मागणीही केली जात आहे. यावर आता स्वतः शिल्पानेही प्रतिक्रिया दिली आहे.

शिल्पा शिंदेच्या अटकेची मागणी

अलीकडेच शिल्पा शिंदेने भारती सिंह हिच्या अलीकडेच दिलेल्या पॉडकास्टमध्ये ‘भाबी जी घर पर हैं’च्या निर्मात्यावर केलेले छळाचे आरोप खोटे असल्याचं म्हटलं. त्यानंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. दरम्यान, दिल्लीतील NGO NCMIndia Council For Men Affairs ने मुंबई पोलिसांना टॅग करत शिल्पाला अटक करण्याची मागणी एक्सवर केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये शिल्पाचा कबुलीजबाब असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आदरणीय मुंबई पोलिस, कृपया शिल्पा शिंदेला तिच्या निर्मात्याविरोधात खोटा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी अटक करा.”

या प्रकरणामुळे वाद आणखी चिघळला असून शिल्पाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. यावर  अभिनेत्री शिल्पा शिंदे म्हणाली, “मी इथे कोणालाही स्पष्टीकरण द्यायला बसलेली नाही. मला आधीपासून माहिती होतं की असंच होणार. पॉडकास्टमधील माझं वक्तव्य अर्धवट समजून ते वेगळ्या पद्धतीने मांडलं जात आहे.संपूर्ण पॉडकास्ट न पाहता केवळ एका ओळीवरून मत बनवणं, हे पेड पीआरचं काम आहे.मला समजून घेणाऱ्या आणि कायम पाठिंबा देणाऱ्या माझ्या हितचिंतकांचे मनापासून आभार.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shinde (@shilpa_shinde_official)

नेमकं काय म्हणाली शिल्पा शिंदे ?

'भाभीजी घर पर है' या मालिकेदरम्यानच्या कठीण काळाबद्दल शिल्पा बोलत होती. त्या काळात तिच्यावर होत असलेला प्रचंड मानसिक दबाव आणि करियर संपवण्याचे होणाऱ्या प्रयत्नांपासून स्वतःला वाचवण्यासाठी तिने हे आरोप केले होते. ती म्हणाली ' त्यावेळेस माझी सटकली होती. त्या शोनंतर माझ्यासोबत जे झालं ना, इंडस्ट्रीने माझ्यासोबत ज्या प्रकारचे वर्तन केलं, " तुम्ही कुठेच काम करू शकत नाही असं कॉन्ट्रॅक्ट करा"त्यांचं असं म्हणणं होतं की हिला कुठेच काम करू देऊ नका. मला घाबरवण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यांचा असं होत की, 'ही हातातूनही जायला नको आणि हिचे पैसेही वाढवायला लागणार नाहीत."

"माझं असं होतं की, मी हे करणार नाही. मी त्यांना अनेकदा सांगितलं की मला दुसरीकडे कामच करायचं नाही, कारण यातूनच वेळ मिळत नाही. पण त्यांनी इथे तिथे बोलून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे एक कॉल रेकॉर्डिंग आहे, जात समोरील व्यक्ती मला सांगत होती की, आम्ही बालाजीमध्ये असंच करायचो. तुम्ही माध्यमांना सांगा की सिरीयल सोडली म्हणून..त्यांनी माझं दहा दिवसांचं शूट दोन दिवसात उरकलं.आणि मला अचानक सांगण्यात आलं की उद्यापासून तुमचा शूट नाही. आणि कोणाला काही कळायच्या आत तर न्यूजमध्ये 'भाभीजी घर पे नही है ' असे मथळे आले होते. हे त्यावेळी मला घाबरवण्यासाठी केलं होतं. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट साइन करायचा आहे की नाही? असं खुर्चीत बसून मला विचारलं. करायचं नसेल तर शो सोडा असं सांगितलं. यावर त्यांचं म्हणणं होतं की मी तुला घरी बसवेन,मी तुला कुठेच काम करू देणार नाही. मग तर मी करायचंच नाही हे ठरवलं. " असे अनेक खुलासे तिने केले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BHARTI TV (@bhartitvnetwork)

लैंगिक छळाच्या आरोपावर म्हणाली..

छळाच्या केसविषयी ती म्हणाली " मी माझ्या निर्मात्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते.कारण माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. त्यानंतर मी त्यातून बाहेर निघाले आहे. त्यावेळी कुठल्याही निर्मात्याने त्याची साथ दिली नाही. पोलीस एफआयआर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला घाणेरड्या गोष्टीही लिहाव्या लागतील असं सांगतात. मी वकील पेशातून आहे. माझ्या अनेक मित्रांनी मला विचारलेले तू काय करतेस तुला कळतंय का ? मी त्यावेळीही म्हटलं होतं माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी शो सोडला, मी शो सोडला असं म्हणणं पलीकडे माझ्याकडे कुठलाही रस्ता नाही. त्यावेळी स्वतः संजय कोहलीही म्हणत होते, तुम्ही चारी बाजूंनी तिचे रस्ते बंद केले तर कुठून तरी बाहेर निघणारच ना!'विचारा तो माणूस या सगळ्यात बदनाम झाला."

"मी आज हे उघडपणे बोलत होते की ते सगळं खोटं होतं. हे मी आज पहिल्यांदा कबूल करत आहे.  नंतर आमची सेटलमेंट झाली.जे पेमेंट तुम्हाला तीन महिन्यानंतर मिळतं, ते मला तेव्हा मिळालं.तेव्हा असं ठरलं होतं की, 'ना तुम्ही कुठल्या विषयावर बोलाल ना आम्ही बोलू'. पण त्यांच्यासाठी सुद्धा ही सगळी गोष्ट घेऊन पुढे जाणं कठीण होतं. आज 11 वर्षांनी मी हे सगळं बोलते आहे. एवढं सगळं होऊनही मी त्या लोकांसोबत काम करते. आणि आता आमचे संबंध हे पूर्वेपेक्षा खूपच चांगले आहेत.ती वेळच मी सांगू शकत नाही काय होती. 'काय वाटेल ते होऊ दे' असं म्हणत मी त्यावेळी लढले. वर्षभरानंतर अशा प्रकारची केस दाखल करणे हे माझ्यासाठी खूप अवघड होतं.पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता." असं अभिनेत्री शिल्पा शिंदेने या पॉडकास्टमध्ये सांगितलं.

काय होतं शिल्पा शिंदेचं खोटं आरोप प्रकरण ?

2016 मध्ये भाभीजी घर पर है ही मालिका प्रचंड यशस्वी ठरत असताना अभिनेत्री शिल्पा शिंदेचे प्रोडक्शन हाऊस सोबत गंभीरवात झाले होते.शिल्पावर निर्मात्यांनी विशिष्ट करारावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला.यामुळे तिला कुठेही दुसरीकडे काम करता येणार नव्हतं. इंडस्ट्रीतून बहिष्कार टाकण्याची धमकी तिला मिळत होती.आमचा ऐकलं नाहीस तर कुठेही काम मिळणार नाही असं सांगून तिचा मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी तिने हे पाऊल उचललेलं.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.