इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपल्या नागरिकांना इशारा देणारे एक निवेदन जारी केले. गुरुवारी मोजतबा म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलसारख्या शत्रू राष्ट्रांनी इराणच्या सामर्थ्यापुढे शरणागती पत्करली आहे. आता ते अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेमध्ये निराशा किंवा वैफल्य निर्माण करणारी कोणतीही कृती ही शत्रूला मदत करण्यासारखीच आहे.
इराणला भीती आहे की, इस्रायल आणि अमेरिका त्याच्याविरुद्ध संकरित युद्ध सुरू करू शकतात. इस्रायल आणि अमेरिकेने यापूर्वी इराणमध्ये अंतर्गत बंडखोरी भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर, मोजतबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च नेते झाल्यापासून, मोजतबा खामेनी सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. मोजतबा यांचा कोणताही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
India-Nepal Dispute: बालेन शाहांवर दबाव वाढला, तरीही शांत; पण नेपाळ सरकारने सीमा वाद मिटवण्यासाठी उचललं पाऊलमोजतबा केवळ लिखित संदेश देत आहेत, ज्यामुळे इराणी माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी इराणच्या जनतेला उठाव करण्याचे आवाहन केले. सरकारला धडाशिकवण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे ते म्हणाले. सीएनबीसीशी बोलताना नेतान्याहू म्हणाले की, इराणी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. जर लोक रस्त्यावर उतरले, तर सरकार कोसळू शकते.
मे २०२६ मध्ये, शस्त्रसंधीच्या काळात, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने इराकी सीमेवर अमेरिकन बनावटीच्या शस्त्रांचा साठा जप्त केल्याचा दावा केला. स्थानिक माध्यमांनुसार, भविष्यात संभाव्य बंडखोरीला खतपाणी घालण्यासाठी या शस्त्रांची इराणमध्ये तस्करी केली जात होती. इराणचे पहिले सर्वोच्च नेते खोमेनी यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त खामेनी म्हणाले, "शत्रू इराणविरुद्ध लष्करी आणि मानसिक युद्ध या दोन्हींचा समावेश असलेले संकरित युद्ध पुकारत आहे. अशा वेळी इराणी जनतेने एकजूट राहणे आवश्यक आहे."
Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅनमोजतबा यांनी पुढे सांगितले की, इराण खोमेनींनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करत आहे. त्यांच्या विचारांचे आजही पालन केले जात आहे. सर्वोच्च नेत्यांच्या मते, इस्रायल आणि अमेरिका इराणी जनतेला निराश करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या सरकारविरोधात भडकवण्यासाठी फूट पाडणाऱ्या शस्त्रांचा वापर करत आहेत.