राजकीय नेत्यांची संपत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेव्हा एखादा नेता निवडणूक लढवण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज भरतो, त्यावेळी त्याने सादर केलेल्या आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामधून तो नेमका किती संपत्तीचा मालक आहे, हे उघड होतं. असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या एका रिपोर्टनुसार देशभरात भाजपचे जेवढे काही मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी तफावत असल्यचं समोर आलं आहे. काही मुख्यमंत्र्यांकडे प्रचंड संपत्ती आहे, तर काही मुख्यमंत्र्यांकडे अतिशय कमी संपत्ती आहे. तुम्हाला माहिती आहे का? भाजपाचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे? तसेच भाजपाचे सर्वात गरीब मुख्यमंत्री कोणत आहेत? आणि त्यांची संपत्ती किती आहे?
भाजपाचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे देशातील सर्वात श्रीमंत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 332 कोटी रुपयाहून अधिक आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये चल आणि अचल अशा दोन्ही संपत्तीचा समावेश आहे. पेमा खांडू हे सध्या स्थितीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. पेमा खांडू यांची एकूण संपत्ती ही 332 कोटी रुपये असून त्यांच्यावर 180 कोटी रुपयांचं कर्ज आहे, अशी माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सादर केली होती. पेमा खांडू यांचा देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत दुसरा क्रमांक लागतो, पहिल्या क्रमाकांवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे आहेत.
भाजपाचे सर्वात गरीब मुख्यमंत्री
भाजपाचे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री आहेत, निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे केवळ 1.46 कोटी रुपये एवढीच संपत्ती आहे. ज्यामध्ये चल आणि अचल संपत्तीचा समावेश आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे देखील खूप थोडी संपत्ती आहे. भजनलाल शर्मा यांच्यानंतर सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये योगी आदित्यनाथ यांचा दुसार क्रमांका लागतो. त्यांच्याकडे 1. 54 कोटी रुपयांची संपत्ती आहे.