Nanded MLC Election: एकीकडे महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर यांच्या विजयासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांशी जुळवून घेतले. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत राजूकर यांना तिसऱ्यांदा आमदार करण्याचा चंग चव्हाण यांनी बांधला आहे. परंतू अशोक चव्हाण यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी असणार नाही, याची काळजी काँग्रेसकडून घेतली जात आहे.
Gokul Politics : महायुतीला कोर्टात तोंडावर पडण्याची भीती अन् रात्रीत फिरला गेम : गोकुळमधील ४२७ अपात्र संस्थेतील २७० संस्था पुन्हा पात्रउमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसच्या एका खेळीने अशोक चव्हाण यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी माघार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांना महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या तासाभराच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल हा राज्याला धक्का देणारा ठरेल असा दावा काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी केला आहे. आमच्याकडे महायुतीच्या तुलनेत संख्याबळ आहे. ही निवडणूक बिनविरोध काढण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न होता. परंतू आम्ही मतदारांना सक्षम पर्याय दिला आहे. त्यामुळे निश्चितच नांदेडचा निकाल वेगळा असेल, असा दावाही चव्हाण, आष्टीकर यांनी केला.
Prashant Jagtap: शरद पवारांच्या निर्णयाने विश्वासघात! महायुतीपुढे सरेंडर झाले, प्रशांत जगताप संतापले जिंकण्यासाठी लढतोय..खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आम्ही नांदेडची जागा जिंकण्यासाठी लढतो आहोत. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत चिखलीकर आणि मी एकत्र आल्याने शेअर मार्केट घसरल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर स्मित हास्य केले होते. आम्ही शेअर मार्केटमध्ये बुम आणण्यासाठी आलो आहोत, असा टोलाही नागेश पाटील आष्टीकर यांनी महायुतीला लगावला.
जागा जिंकायची म्हणून माघार..नांदेड विधान परिषदेची जागा जिंकून जिल्ह्यातील काही नेत्यांची मक्तेदारी आम्हाला मोडून काढायची आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनूसार आमचे उमेदवार रामदार पाटील सुमठाणकर यांनी माघार घेतली आहे. महायुतीचा ही जागा बिनविरोध काढण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे. मतदारांना सक्षम पर्याय दिला तर ते वेगळा निर्णय घेऊ शकतात. निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यावर हे समोर येईल. महाविकास आघाडीने ही जागा ताकदीने लढवण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार केला आहे. ही जागा जिंकण्यासाठी आम्ही माघार घेतल्याचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.