बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय म्हणाले?
Marathi June 05, 2026 05:25 PM

बाळ माने यांच्यावर नारायण राणे : चोराच्या उलट्या बोंबा आहेत. माने हा भाजपचा ओरीजनल आहे. निवडणुक आली की तळ्यात-मळ्यात ते करतात. बाळ मानेला सिरीयस घेऊ नका. निवडणुक आली की बाळ माने 5 वर्षाची तडजोड करतो. त्याच्यावर विश्वास टाकायची गरज नाही. अशी बोचरी टीका खासदार आणि भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. दरम्यान, विनायक राऊत हे काय शब्द पाळणारे आहेत का? विनायक राऊत्यांचे बाकी धंदे बंद झाले आहेत च्या? असा सवालही त्यांनी यावेळी केला. कोणी पैसे घेतले हे मला माहिती नाही, संजय राऊतांना माहिती आसेल कोणी आणि किती पैसे घेतले, कारण माघार कोणी असच घेत नाही, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या आरोपांनाहे उत्तर द्या दिलंय.

Bal Mane : बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी, विनायक राऊतांकडून बाळ मानेंचा गद्दार असा उल्लेख

कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची (Konkan Vidhan Parishad Election 2026) निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) बाळ माने (Bal Mane) अशी लढत रंगणार होती. मात्र बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला. यावेळी बाळ मानेंसोबत भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) उपस्थित होते. त्यामुळे बाळ मानेंच्या या कृतीविरोधात ठाकरेसेनेत कमालीचा रोष पाहायला मिळाला. बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तर माजी खासदार विनायक राऊतांनी बाळ मानेंचा गद्दार असा उल्लेख केला.

कोण आहेत बाळ माने? (Who Is Bal Mane)

बाळ माने हे मूळचे रत्नागिरीचे असून ते भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार होते.  बाळ माने सुरुवातीला भाजपमध्ये होते आणि रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जागा न मिळाल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आणि उदय सामंत यांच्याविरुद्ध 2024 मधील विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र उदय सामंत समोर बाळ माने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.