Good News for Amol Kolhe Fans: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule) ही मालिका (Serial) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका आहे. अवघ्या 5 महिन्यांत या मालिकेनं निरोप घेतल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच डॉ. अमोल कोल्हे यांनीही सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन नाराजी व्यक्त केली. 'मालिका संपतेय पण ही गोष्ट सुरू राहणार', असं अमोल कोल्हेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, एकीकडे डॉ. अमोल कोल्हेंची एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे, तर दुसरीकडे झी मराठी वाहिनीवर त्यांची दुसरी ऐतिहासिक मालिका पुन:प्रसारित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
स्टार प्रवाहवरील सर्वात गाजलेली मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका 14 जून रोजी संपणार आहे. डॉ. अमोल कोल्हेंनी या मालिकेसंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शनही दिलं आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी, 'जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते… थोडंसं थांबणं आवश्यक असतं.. जरा निवांत होणं गरजेचं असतं… पुन्हा नव्याने गणितं मांडण्यासाठी. .. नव्या जोमाने झेपावण्यासाठी!', असं त्यांनी म्हटलं आहे.
View this post on Instagram
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका संपत जरी असली तरी, दुसरीकडे त्यांचीच मालिका पुन:प्रसारित केली जाणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही ऐतिहासिक मालिका झी मराठी वाहिनीवर पुन: प्रसारित केली जाणार आहे. झी मराठी वाहिनीने याचा अधिकृत प्रोमोही शेअर केला आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'शंभूराजांच्या पराक्रमाचा इतिहास पुन्हा एकदा उलगडणार! 'स्वराज्यरक्षक संभाजी' 8 जूनपासून सोम-शनि | 6 PM', असं म्हटलं आहे.
'स्वराज्यरक्षक संभाजी' या ऐतिहासिक मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. झी मराठी या वाहिनीवर ही मालिका रात्री नऊ वाजता प्रसारित केली जात होती. छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा या मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवता येत होता. दरम्यान, ही मालिका पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर 8 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 8 जूनपासून सायंकाळी 6 वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. ही मालिका पुन: प्रसारित केली जाणार असल्यामुळे प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या: