अंबाजोगाई: मोरेवाडी (ता. अंबाजोगाई) येथील तलाठ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेचे कारण आता स्पष्ट होऊ लागले आहे. पत्नीने सोबत राहण्यास नकार दिल्यामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली, अशी फिर्याद मृताच्या आईने दिली आहे. यावरून मृताच्या पत्नीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गणेश दत्तू कोळी (वय २६) या तलाठ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाईलगतच्या मोरेवाडी परिसरात (ता. २५ मे) घडली होती. या प्रकरणी गणेशची आई सुनंदा कोळी (रा. नांदूर्गा, ता. औसा, जि. लातूर) यांनी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
Kolhapur Police Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, एसपींनी काढले आदेशत्यानुसार, त्यांचा मुलगा गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून भरती झाला होता. पुढे त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. मार्च २०२६ मध्ये गणेशचा विवाह बीड येथील एका मुलीशी (ता. १३ मे) झाला. ती एका ठिकाणी नोकरीस होती.
कारने धडक देताच दुचाकीवरील चौघे हवेत उडाले, चिमुकलीसह चौघांचाही जागीच मृत्यू; घटनास्थळी रक्ताचा सडालग्नानंतर पती-पत्नी कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचे वागणे त्याला संशयास्पद वाटले. सत्यनारायणाची पूजा झाल्यावरही पत्नीच्या वागण्यात बदल झाला नाही. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला अन् ती घरातून निघून गेली. गणेश (ता. २४ मे) पत्नीला भेटण्यासाठी अंबाजोगाईला गेला. ता. २५ मे रोजी त्याने बहिणीला फोनवरून सर्व प्रकार सांगितला. यानंतर त्याने काही वेळातच पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली होती.