Asian Games 2026 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं गोल्ड मेडल मिळवण्याच्या हेतूने उतरणार मैदानात
esakal June 06, 2026 05:45 PM

आगामी एशियन गेम्ससाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. यंदाच्या संघात काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. टी-२० क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याला संघात स्थान मिळाले आहे. मागील एशियन गेम्समध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे यंदाही सुवर्णपदकाची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

दिल्लीसमोर वरुण-सुनीलचा चक्रव्यूह; कोलकता नाइट रायडर्सविरुद्धचा सामना दोघांसाठी महत्त्वाचा, पहा कशी असेल Playing 11

या संघात यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन आणि इशान किशन यांनाही संघात संधी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या हर्षित राणाचेही संघात पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असणार आहे.

अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांच्याकडूनही संघाला मोठ्या अपेक्षा असतील. फिरकी विभागात रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांची निवड करण्यात आली आहे.

IPL 2026: धोनीशिवाय चेन्नई आज पहिल्यांदा मैदानात; संजू सॅमसन विरुद्ध जडेजा लढतीवर लक्ष, कशी असेल संभावित Playing XI

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.