India T20I Squad: भारतीय संघाला जूनच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यांतील टी२० मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा झाली आहे. या दौऱ्यापासून भारताला नवे टी२० कर्णधार आणि उपकर्णधार मिळाले आहेत.
भारताच्या निवड समितीची मुंबईत आज बैठक पार पडली. या बैठकीत आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासोबतच (Ireland & England Tour) सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही भारतीय टी२० संघाची निवड करण्यात आली आहे.
IND vs AFG, Playing XI: भारतीय संघाने जिंकला टॉस, रवींद्र जडेजाच्या जागेवर पदार्पण करणारा मानव सुतार कोण? नवा कर्णधारयावेळीच भारताचा नवा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०२३ पासून श्रेयस अय्यर भारतीय टी२० संघातून बाहेर आहे. त्याला जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले होते, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.
मात्र श्रेयसने गेल्या काही वर्षात आयपीएलमध्ये दाखवलेल्या नेतृत्वगुणांमुळे त्याच्यावर कर्णधारपदासाठी विश्वास दाखवण्यात आला आहे. याशिवाय त्याने फलंदाजीतही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तो भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधारही आहे.
श्रेयस अय्यर आता सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) जागा घेईल. तीन महिन्यांपूर्वी टी२० वर्ल्ड कप जिंकणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला टी२० कर्णधारपदावरून काढण्यात आले आहे, इतकंच नाही, तर आता त्याला भारताच्या टी२० संघातही जागा देण्यात आलेली नाही.
सूर्यकुमार यादवचा फलंदाज म्हणून गेल्या दोन वर्षात फारसा चांगला फॉर्म नव्हता. त्यातही तो नुकत्यात झालेल्या आयपीएल २०२६ स्पर्धेतही फारसे काही खास करू शकला नव्हता. त्यामुळे त्याला कर्णधारपदासोबतच संघातील जागाही गमवावी लागली आहे.
नवा उपकर्णधारनिवड समितीने अक्षर पटेलकडूनही (Axar Patel) टी२० उपकर्णधारपद काढून घेतले असून २३ वर्षीय युवा फलंदाज तिलक वर्माकडे (Tilak Varma) ही जबाबदारी सोपवली आहे. तिलक गेल्या काही वर्षांपासून भारताच्या टी२० संघाचा प्रमुख भाग राहिला आहे.
वैभव सूर्यवंशीचीही निवड१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही (Vaibhav Sooryavanshi) भारताच्या टी२० संघात निवडण्यात आले आहे. त्याने आयपीएल २०२६ स्पर्धेत १६ सामन्यात ७७६ धावा करत सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे आता तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे, ज्याला भारताच्या संघात संधी मिळाली आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराहला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
IND vs AFG: रिषभ पंतला कसोटी उपकर्णधारपद काढून घेतल्यानंतर गौतम गंभीरची वॉर्निंग; म्हणाला, 'त्याने बदलण्याची गरज नाही, पण...' आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघ -श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ -श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, वैभव सूर्यवंशी
२६ जून - पहिला टी२० सामना, बेलफास्ट
२८ जून - दुसरा टी२० सामना, बेलफास्ट
१ जुलै - पहिला टी२० सामना, चेस्टर-ल-स्ट्रीट (रा. ११ वा.)
४ जुलै - दुसरा टी२० सामना, मँटेस्टर (संध्या. ७.०० वा.)
७ जुलै - तिसरा टी२० सामना, नॉटिंगघम (रा. ११ वा.)
९ जुलै - चौथा टी२० सामना, ब्रिस्टोल (रा. ११ वा.)
११ जुलै - पाचवा टी२० सामना, साऊथॅम्पटन (रा. ११ वा.)
१४ जुलै - पहिला वनडे सामना, बर्मिंगघम
१६ जुलै - दुसरा वनडे सामना, कार्डिफ
१९ जुलै - तिसरा वनडे सामना, लॉर्ड्स