Popular National Award Winner Actor Death: मल्याळम चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते सलीम कुमार ( Salim Kumar) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शनिवारी ( 6 जून ) रात्री 10.43 वाजता कोची येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 56 वर्षांचे होते. त्यांना कोचीतीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ( Salim Kumar Passed Away) मिळालेल्या माहितीनुसार अभिनेते सलीम कुमार यांना आरोग्याच्या समस्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यू होण्यापूर्वी ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या निधनाने मल्याळम मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक चांगला अभिनेता गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. ( Malyalam Actor Death)
अभिनेते सलीम कुमार हे तमिळ मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलावंत होते. 'सत्यमेव जयते', 'थेनकसीपट्टिनम', 'वन मॅन शो', 'कल्याणरामन', आणि 'सीआयडी' अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ते दिसले आहेत. 'अचानुरंगथा वीडू' मधील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. नंतर, राष्ट्रीय पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सलीम कुमार यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित रुग्णालयाने 6 जून रोजी रात्री सलीम कुमार यांच्या निधनाबाबत एक वैद्यकीय बुलेटीन जारी केलं. यात 'व्हेंटिलेटर सपोर्ट, अँटिबायोटिक्स आणि डायलिसिस व्यतिरिक्त त्यांना वाचवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या.मात्र रुग्णालयात दाखल असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. परिणामी, प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही ' असं रुग्णालयाने म्हटलं.
#WATCH | Kochi, Keralam | Renowned Malayalam actor and National Award winner Salim Kumar passes away at the age of 56.
— ANI (@ANI) June 7, 2026
Visuals from the hospital in which the actor was admitted pic.twitter.com/2bn9QyIzFF
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना किडनीच्या समस्या व्यतिरिक्त लिव्हर सिरोसिस आणि क्रोनिक अब्स्ट्रक्टिव्ह पलमोनरी आजार होता. काही वर्षांपूर्वी अभिनेते सलीम कुमार यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती.अवघ्या एक दिवसापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. नंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार 'अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं. मात्र तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते सलीम कुमार यांच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात नाट्य आणि नकलेने झाली. या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवल्यानंतर 1997 मध्ये त्यांनी चित्रपट करण्यास सुरुवात केली. इस्टमनू नूरू वट्टम या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.अल्पावधीतच मल्याळम चित्रपटसृष्टीत सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी ठरले.आपल्या विनोदी आणि भूमिकांच्या निवडीवर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख बनवली.