पुढील आठवड्यात मोफत शेअर्सचा वर्षाव, दोन कंपन्या देणार Bonus Shares, रेकॉर्ड तारखा तपासा
ET Marathi June 07, 2026 01:45 PM
मुंबई : पुढील आठवड्यात काही कंपन्यांच्या भागधारकांवर मोफत शेअर्सचा वर्षावही होणार आहे. नवीन आठवड्यात दोन कंपन्या बोनस शेअर्स देणार आहेत. यापैकी एक बँकिंग क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तर दुसरी कंपनी लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रात कार्यरत आहे. कोणत्या कंपनीची एक्स-डेट कोणत्या दिवशी आहे हे गुंतवणूदारांसाठी जाणून घेणे आवश्यक आहे.

गौतम एक्झिम लिमिटेड
गौतम एक्झिम लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी ३:१ या प्रमाणात जाहीर केले आहेत. याचा अर्थ तुमच्याकडे या कंपनीचा एक शेअर असेल, तर कंपनी त्या बदल्यात तुम्हाला तीन शेअर्स मोफत देईल. बोनस मिळाल्यानंतर तुमच्या एकूण शेअर्सची संख्या चार होईल. कंपनीने यासाठी एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेट दोन्ही १० जून, २०२६ अशी निश्चित केली आहे.

सिटी युनियन बँक लिमिटेड
सिटी युनियन बँक आपल्या भागधारकांना १:३ या प्रमाणात देणार आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे बँकेचे तीन शेअर्स आहेत, त्यांना एक बोनस शेअर विनामूल्य मिळेल. अशाप्रकारे तीन शेअर्स असलेल्या गुंतवणूकदारांकडे एकूण चार शेअर्स असतील. बोनस शेअर्ससाठी बँकेने आपली एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेट १२ जून, २०२६ अशी निश्चित केली आहे.

बोनस शेअर्स म्हणजे काय?
बोनस शेअर्स मिळाल्याने कंपनीच्या मूलभूत गोष्टींमध्ये किंवा तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या मूल्यात लगेच लक्षणीय बदल होत नाही. कारण शेअरची किंमत प्रमाणानुसार समायोजित होते. मात्र, दीर्घकाळातगुंतवणूकदारांसाठी हा एक अतिशय फायदेशीर सौदा आहे. कारण भविष्यात जेव्हा या कंपन्या पुन्हा लाभांश जाहीर करतील, तेव्हा तुम्हाला या वाढलेल्या विनामूल्य शेअर्सवर भरीव नफा मिळेल.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.