<<निलिमा प्रधान>>
मेष – कामाचा ताण जाणवेल
शुक्र राश्यांतर, चंद्र बुध त्रिकोणयोग. मनाविरुद्ध घटना घडतील. इतरांचे वागणे त्रासदायक ठरेल. संयम ठेवा. वादविवाद वाढेल. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. मात्र अविश्वास दाखवला जाईल. शुभ दि. 7, 8
वृषभ- रागावर ताबा ठेवा
शुक्र राश्यांतर, चंद्र, मंगळ युती. वाहन चालवताना सावध रहा. कामांना गतिमान करता येईल. रागावर ताबा ठेवा. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे मांडाल. प्रतिष्ठा लाभेल. शुभ दि. 8, 9
मिथुन- अहंकार दूर ठेवा
शुक्र राश्यांतर, चंद्र, मंगळ लाभयोग. अहंकार न ठेवता कामे करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात कर्जाच्या कामात हलगर्जीपणा नको. वसुली होईल. कायद्याचे पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तत्परता ठेवा. वाद वाढवू नका. शुभ दि.7, 8
कर्क- परदेशी जाण्याची संधी
सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र राश्यांतर. रेंगाळत राहिलेली कामे पूर्ण करा. शब्द जपून वापरा. प्रसंगावधान ठेवा. नोकरीधंद्यात जम बसेल. कर्जाचे काम करा. परदेशी जाण्याची संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील ताण संपवा. शुभ दि. 9, 10
सिंह- प्रकृतीची काळजी घ्या
शुक्र राश्यांतर चंद्र, बुध त्रिकोणयोग. निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. अहंकाराने वागणे नुकसानकारक. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी टिकवा. नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिशाभूल होण्याची शक्यता. चौफेर सावध रहा. शुभ दि. 7, 8
कन्या- मनाप्रमाणे घटना घडतील
शुक्र राश्यांतर, चंद्र, बुध त्रिकोणयोग. तुमच्या हुशारीचा फायदा घेतला जाईल. प्रवासात सावध रहा. चुका टाळा. मनावर दडपण राहील. संताप वाढेल. कायदा पाळा. नोकरीत दगदग वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. शुभ दि. 9, 10
तूळ-कलाक्षेत्रात मन रमेल
शुक्र राश्यांतर, चंद्र, बुध त्रिकोणयोग. कोणतेही क्षेत्र असो कायदा पाळा. संयमाने बोला. नोकरीत चूक होऊ देऊ नका. नवीन परिचय उत्साहवर्धक. साहित्य, कलाक्षेत्रात मन रमेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सौम्य धोरण ठेवा. प्रतिष्ठा राखा. शुभ दि. 7, 8
वृश्चिक-व्यवहारात संयम ठेवा
शुक्र राश्यांतर, सूर्य, चंद्र लाभयोग. व्यवहारात संयम ठेवा. वाद वाढवू नका. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करू नका. नोकरीत कामावर लक्ष द्या. धंद्यात कडवट शब्द नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. चर्चेत सावध रहा. शुभ दि. 9, 10
धनु-कामावर लक्ष द्या
शुक्र राश्यांतर, चंद्र, बुध त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो कामावर लक्ष द्या. चुका करणे टाळा. कायदा मोडेल असे कृत्य नको. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात बोलले जाईल. प्रसंगावधान राखा. प्रकृती जपा. शुभ दि. 7, 8
मकर-कामाचे नियोजन करा
शुक्र राश्यांतर, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. महत्त्वाची किचकट कामे करून घ्या. कामाचे योग्य नियोजन करा. शब्द जपून वापरा. चर्चेतून होणारा वाद टाळा. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवी दिशा मिळण्याची संधी. शुभ दि. 9, 10
कुंभ- हलगर्जीपणा नको
शुक्र राश्यांतर, चंद्र बुध लाभयोग. प्रकृतीची काळजी घ्या. कुठेही हलगर्जीपणा नको. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. चातुर्य आणि व्यवहाराची सांगड घाला. धंद्यात संयम बाळगा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान राखा. शुभ दि. 7, 11
मीन-प्रगतीची संधी लाभेल
शुक्र राश्यांतर, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. शब्द जपून वापरा. कार्याला योग्य दिशेने पुढे न्या. कामे रेंगाळत ठेवू नका. साडेसाती सुरू आहे तरी प्रगतीची संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, अधिकार, लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 11, 12