मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
सूरज सावंत June 07, 2026 07:43 PM

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत (Mumbai) दररोज अब्जावधींची उलाढाल होत असते, त्यामध्ये अवैध धंदे, तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीच्याही घटना समोर येतात. गोल्ड (Gold) तस्करी हेही मुंबईच्या पोलिसांपुढे, विमानतळ पोलीस अधिकाऱ्यांपुढे मोठं आव्हान असतं. मात्र, मुंबईतील संचालनालय महसूल गुप्तचर (DRI) विभागाकडून सात्याने मुंबई विमानतळावरुन होणारी तस्करी रोखण्यात आल्याचं आपण पाहिलं आहे. आता, ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) डीआरआयने सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. 

डीआरआयच्या मुंबई विमानतळावरील कारवाईत सुमारे 3.2 किलो परदेशी सोन्याची धूळ (वॅक्स स्वरूपात) जप्त करण्यात आली असून त्याची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये आहे. या प्रकरणात 3 बांगलादेशी व श्रीलंकन नागरिक, 3 विमानतळ कर्मचारी आणि 1 रिसिव्हर अशा एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या माहितीनुसार, बँकॉकहून मुंबईमार्गे प्रवास करणारे परदेशी नागरिक शरीरात सोनं लपवून आणत होते. विमानतळावरील काही कर्मचारी हे सोनं बाहेर काढून स्थानिक एजंटांकडे पोहोचवत होते. कारवाईदरम्यान दोन बस चालक आणि एका कोच मॉनिटरला सोन्याची डिलिव्हरी करताना पकडण्यात आले.

दरम्यान, कस्टम्स कायदा, 1962 अंतर्गत सोनं जप्तीची कारवाई करण्यात आली असून संपूर्ण तस्करी साखळी उद्ध्वस्त करण्यात डीआरआयला यश आले आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू असून हे सोनं नेमकं कुठे जाणार होतं, कुठून आलं होतं याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. 

घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.