एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
जयदीप मेढे June 08, 2026 12:13 AM

England vs New Zealand: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडचा 115 धावांनी पराभव केला. चौथ्या डावात 254 धावांचे लक्ष्य असताना, न्यूझीलंडला प्रत्युत्तरात केवळ 138 धावाच करता आल्या. लॉर्ड्सवर खेळला गेलेला हा 150 वा कसोटी सामना होता आणि बेन स्टोक्सने कर्णधार म्हणून विजय मिळवून इतिहास रचला. बेन स्टोक्सने आता इंग्लंडच्या सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांच्या यादीत अॅलिस्टर कूक आणि अँड्र्यू स्ट्रॉस यांची बरोबरी केली आहे. कर्णधार म्हणून स्टोक्सचा हा 24 वा कसोटी विजय होता. स्ट्रॉस आणि कूक यांनीही कर्णधार असताना इंग्लंडसाठी 24 कसोटी सामने जिंकले आहेत. इंग्लंडचा आघाडीचा कसोटी कर्णधार जो रूटने 27 सामने जिंकले आहेत.

एकाच सामन्यात 40 विकेट

अलीकडच्या काळात कसोटी सामन्यात सर्व 40 विकेट पडणे दुर्मिळ झाले आहे. इंग्लंडने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 140 आणि 226 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 113 आणि 138 धावा केल्या. सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज न्यूझीलंडचा नॅथन स्मिथ होता, ज्याने दोन्ही डावांमध्ये मिळून 9 बळी घेतले. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सन आणि गस ऍटकिन्सन यांनी प्रत्येकी 7 बळी घेतले.

इंग्लंडने 150 वा कसोटी सामना जिंकला

लॉर्ड्स हे इतिहासात सर्वाधिक कसोटी सामन्यांचे आयोजन करणारे स्टेडियम आहे. लॉर्ड्सवरील 150व्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 140 धावांवर संपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 113 धावा केल्या, ज्यामुळे इंग्लंडला 27 धावांची माफक आघाडी मिळाली, जी नंतर निर्णायक ठरली. दुसऱ्या डावातही इंग्लंडची मधली आणि खालची फळी अपयशी ठरली, पण बेन डकेटच्या 33 आणि एमिलियो गेच्या 57 धावांच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 226 धावा केल्या. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले. डेव्हॉन कॉनवेने 41 आणि ग्लेन फिलिप्सने 44 धावा करून न्यूझीलंडला सामन्यात टिकवून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्यांना पराभव टाळता आला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.