'मी सावित्रीबाई..' मालिकेत स्वतःच्या खापर खापर पणजीची भूमिका साकारली; मालिका संपताच गार्गी फुलेंची पोस्ट, म्हणाल्या..
abp majha web team June 08, 2026 03:13 PM

Gargi Phule On Mi Savitribai Jyotirao Phule Serial Off- Air: स्टार  प्रवाहवरील  'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule) या मालिकेची गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजनष्टीत एकच चर्चा  आहे. अगदी महत्वाच्या टप्प्यावर वाहिनीने TRP चे कारण देत मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला.अवघ्या 152 भागांमध्ये मालिका गुंडाळण्यात आल्याने चाहत्यांना मोठं धक्का बसलाय. मालिकेत काम करणाऱ्या सगळ्यांमध्येच नाराजीचं वातावरण आहे. मालिकेत प्रमुख भूमिका करणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी मालिका वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पान आता कोणाच्याच हातात काहीच उरले नाहीय. सगळेच मालिका संपणार असल्यामुळे उदास आहेत. 

दरम्यान, मालिकेच्या सेटवर सगळ्या कलाकारांनी, सदस्यांनी शेवटचा दिवस घालवला. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्या चर्चा आहे, अभिनेत्री गार्गी फुले यांच्या पोस्टची. गार्गी फुले यांच्यासाठी या मिलीकेचे आणि त्यांचे अगदी घरचे नाते आहे. स्वतःच्याचं खापर खापर पणजीची भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळालेली. मालिका संपल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाल्या गार्गी फुले?

त्या म्हणाल्या, "आज मी सावित्री ज्योतिराव फुले या स्टार प्रवाहच्या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस.... काय बोलावं ते कळत नाहीये.... या सिरीयल मध्ये मी सगुणा आऊ साकारली... Day one पासून अगदी आज पर्यंत सगुणा आऊनी माझी साथ सोडली नाही... अगदी ज्योती आणि सावित्रीला तीने जशी खंबीर साथ दिली तशी मलाही तीने सोडलं नाही... नात्याने आऊ माझी खापर खापर पणजी....पण ती साकारताना आऊ नेच मार्ग दाखवला.... तीने माझ्याकडून ही भूमिका करवून घेतली.... बाकी काय बोलू....Thank you माझे सगळेच सहकलाकार ज्यांनी मला उत्तम साथ दिली आणि एका कुटुंबासारखे सगळे राहिलो.... जगदंब ची सगळी टेकनिकल team, अगदी स्पॉट दादा पासून ते आमच्या ep पर्यंत सगळे फार कमाल आणि perfect professional होते.... ज्यांना माहीत होता त्यांचं काय काय काम आहे....ज्योती, सावी आणि आऊ बरंच बोलले आता थांबते.... अलविदा आऊ"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gargi Phule (@gargiphule)

'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका अवघ्या पाच महिन्यात ऑफ एअर झाल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये स्टार प्रवाह वाहिनी नव्या आठ मालिका आणणार आहे. त्यामुळे अवघ्या 152 भागांमध्येच अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असणारी ' मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ' मालिका गुंडाळण्यात आली. 14 जूनला ही मालिका बंद होईल. दरम्यान मालिकेच्या शुटींगचा शेवटचा दिवस पार पडला.  पाच महिन्यांमध्ये कलाकारांची आणि प्रेक्षकांची नाळ जुळली होती. पण मालिका संपणार असल्याने सारेच जण हतबल आहेत. मात्र, अभिनेते अमोल कोल्हे यांनी मालिका दुसऱ्या मंचावर सुरु राहील असं सांगितल्याने काहीशी आशा अजून जिवंत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.