LPG gas cylinder : सर्वसामान्यांना सरकारचा सर्वात मोठा झटका, एलपीजी गॅस सिलिंडरसंदर्भात अत्यंत मोठा निर्णय
Tv9 Marathi June 09, 2026 12:45 AM

मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मध्य पूर्वेतून होणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या जवळपास ठप्प आहे. त्यामुळे काही प्रमाणात एलपीजी गॅसची टंचाई जाणवत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सरकारने गॅस सिलिंडरच्या एका नियमात बदल केला होता. तो म्हणजे ज्याच्यकडे पीएनजी गॅसचं कनेक्शन आहे. त्याला आता एलपीजी गॅसचं कनेक्शन मिळणार नाही. तसेच ज्याच्याकडे एलपीजीचं कनेक्शन आहे, त्यांंना पीएनजीचं कनेक्शन मिळणार नाही. म्हणजेच एका व्यक्तीच्या नावावर आता दोन कनेक्शन घेता येणार नाही. दरम्यान या नियमात बदल केल्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारने एलपीजी सिलिंडर संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा झटका बसणार आहे.

मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता उज्जवला योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला केवळ चारच सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. पूर्वी या योजनेतील ग्राहकांना वर्षाला 9 गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळायची, मात्र आता सरकारने सबसिडीवाल्या सिलिंडरच्या संख्येमध्ये कपात केली असून, आता केवळ फक्त चारच गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. 2016 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यावेळी सर्वसामान्य लोकांना उज्जवला योजनेंतर्गत 12 गॅस सिलिंडरवर सबसिडीचा लाभ मिळत होता. दरम्यान त्यानंतर गेल्या वर्षी सबसिसिडीवाल्या सिलिंडरच्या कोट्यामध्ये तीन सिलिंडरची कपात करण्यात आली होती. 12 ऐवजी 9 सिलिंडरवरच सबसिडी मिळत होती.

आता हा कोटा आणखी कमी करण्यात आला आहे, त्यामध्ये तब्बल 5 गॅस सिलिंडरची कपात करण्यात आली आहे. आता या योजनेतील लाभार्थ्यांना वर्षातून केवळ 4 सिलिंडरवच सबसिडी मिळणार आहे. यामुळे या योजनेतीला लाभार्थ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. खिशावरील आर्थिक ताण वाढणार आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता डबल फटका बसण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.