जपानमध्ये अस्वलाच्या भीतीमुळे 100 शाळा बंद
Marathi June 10, 2026 08:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जपानमधील उत्सुनोमिया शहरात एका अस्वलाचा वावर आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 100 शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहराच्या विविध भागांत आणि रस्त्यांवर हे अस्वल मुक्तपणे वावरत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अस्वलाचा शोध घेण्यासाठी शिकारी, स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱयांनी मिळून शोधमोहीम हाती घेतली आहे.

टोकियोतील उत्सुनोमिया या शहरात हे अस्वल तीन दिवसांपूर्वी नजरेस पडले होते. स्थानिकांमध्ये घबराट पसरल्याने प्रशासनाने तातडीने शहरातील 94 सरकारी प्राथमिक आणि सहा माध्यमिक अशा एकूण 100 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.