60 सिनेमांचा 'नारद मुनी', फक्त 26 रुपये घेऊन गाठलेली 'स्वप्नांची नगरी'; नशीब फळफळलं अन् बनला इंडस्ट्रीचा सुपरस्टार 'खलनायक'
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 10, 2026 09:43 AM

Actor Jeevan Struggle Life Story: कोणत्याही सिनेमात (Hindi Movies) खलनायकाची भूमिका ही नायक किंवा नायकाइतकीच महत्त्वाची असते, हे तर आपण सारेच जाणतो. कारण, खलनायक नसेल नायक होऊच शकत नाही. जाणकारही हेच म्हणतात की, खलनायकच सिनेमाला खरा जीवंतपणा देतो. अशाच एका खलनायकानं घर सोडून मुंबई गाठली, संघर्ष केला आणि पुढे जाऊन चाहत्यांचा लाडका 'खलनायक' बनला. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय, तो अभिनेता 'जीवन' (Actor Jeevan) नावानं लोकप्रिय होता. पण, त्यांचं खर नाव होतं, ओंकार नाथ धर (Omkar Nath Dhar).  ज्यांना हिंदी सिनेसृष्टीतले (Hindi Film Industry) 'नारद मुनी' (Narada Muni) म्हणूनही ओळखलं जातं. खरंतर जीवन यांचं 10 जून 1987 रोजी निधन झालं, पण आजही त्यांच्या भूमिका, त्यांचे सिनेमे (Movies) आणि त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. 1915 मध्ये काश्मीरमध्ये जन्मलेल्या जीवन यांनी लहानपणापासूनच अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहिलेलं, पण नशिबानं काही वेगळंच त्यांच्यासाठी लिहून ठेवलेलं. नायक बनण्याचं स्वप्न बाळगणारा हा अभिनेता पुढे जाऊन हिंदी सिनेसृष्टीचा 'सुपरस्टार खलनायक' (Superstar Villain) झाला. 

60 सिनेमांत 'नारद मुनीं'ची भूमिका (Played Role Of Narad Muni in 60 Films)

जन्माला येताच नियतीते फासे उलटे पडले आणि डोक्यावरचं मातृछत्र हरपलं. त्यानंतर अवघ्या तीनच वर्षांचे असताना वडिलांनी त्यांना सोडून दिलं. ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झालेला, तिथे अभिनयाला परवानगी नव्हती. परिणामी, वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि खिशात केवळ 26 रुपये घेऊन मुंबई गाठली. त्यांच्या कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षाचा होता. या अडचणींचा सामना करत असताना त्यांनी रोजगाराचा शोध घेतला आणि अखेरीस त्या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शक मोहन लाल सिन्हा यांच्या स्टुडिओमध्ये त्यांना नोकरी मिळाली. जीवन यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांची इच्छाशक्ती पाहून सिन्हा यांनी त्यांना 'फॅशनेबल इंडिया' (Fashionable India) सिनेमात संधी दिली. या संधीमुळे त्यांच्यासाठी पुढील अनेक भूमिकांचे मार्ग मोकळे झाले. विशेष म्हणजे, त्यांनी विविध भाषांमधील सुमारे 60 सिनेमांमध्ये 'नारद मुनीं'ची भूमिका साकारली.

60 फिल्मों में किया एक ही रोल, सिर्फ 26 रुपये लेकर <a>मुंबई</a> आया था ये एक्टर, फिर बना मशहूर खलनायक

1935 मध्ये मिळाली ओळख (Debut With 1935 Film Romantic India)

1950 च्या दशकात बनलेल्या जवळपास प्रत्येक सिनेमात जीवन यांनी 'नारद'ची भूमिका साकारली. 1935 मधील 'रोमँटिक इंडिया' (Romantic India) सिनेमातून त्यांना पहिली ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 'अफसाना', 'स्टेशन मास्टर', 'अमर अकबर अँथनी' आणि 'धर्म-वीर' हे त्यांचे काही सर्वात अविस्मरणीय चित्रपट आहेत. 'नागिन', 'शबनम', 'हीर-रांझा', 'जॉनी मेरा नाम', 'कानून', 'सुरक्षा' आणि 'लावारिस' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला.

GoldenFrames: Jeevan, the incredible 'Narad Muni' of Bollywood! |  Photogallery - ETimes

प्रसिद्ध खलनायक बनले (Industry Superstar Villain)

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, जीवन यांना लवकरच जाणीव झाली होती की, त्यांचा चेहरा मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी योग्य नाही. परिणामी, त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश मिळालं. सिनेनिर्माते विजय भट्ट यांनी ओंकार नाथ धर यांना 'जीवन' हे पडद्यावरील नाव दिलं. त्यांनी पंजाबी सिनेमांमध्येही काम केलंय. जीवन यांनी फोटोग्राफी, नृत्य, ॲक्शन आणि संगीत यांसारख्या क्षेत्रांतही नशीब आजमावलं, पण त्यांना त्यात यश मिळालेलं नाही. 10 जून 1987 रोजी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि इंडस्ट्रीनं सुपरस्टार 'खलनायक' कायमचा गमावला.

 

Bollywood Superstar Madhuri Dixit Life Story: दूरदर्शननं नाकारलं, पहिला सिनेमाही ठरला सुपरफ्लॉप; पण तरीही 'ती' बनली बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'; ओळखलं का कोण?

ABP Majha च्या बातम्या LIVE:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.