कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. मॉन्सून हळूहळू पुढे सरकत आहे. 15 जूनपर्यंत जास्त पाऊस राज्यात नसेल असा इशारा अगोदरच देण्यात आला. आज राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. राज्यातील जवळपास भागात आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. श्रीगंगानगर येथे उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली.श्रीगंगानगर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी लगेचच पेरण्या करू नये, असे सांगण्यात आले. 15 जूननंतर अधिक चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.
आज सकाळीपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. अधूनमधुन पावसाच्या सरी कोसळत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी आणि बोरी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांना आर्थिक फटका बसला आहे. हंगेवाडी आणि बोरी गावामध्ये जवळपास 150 हेक्टर डाळिंब पिकाच नुकसान झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग सुमारे एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेच्या तीव्रतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण असून आगामी शेती कामांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
दाक्षिण कोकण आणि सांगली , सातारा , सोलापूर या जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र, जोपर्यंत पूर्ण पाऊस पडत नाही तो पर्यंत पेरणी करू नका, असा सल्ला भारतीय हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना दिला जात आहे. आज मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यंदा केरळमध्ये दोन दिवस उशिराने मॉन्सून दाखल झाला.