'...यांनी तर सलमान खानच्या 'चोरी चोरी, चुपके चुपके'ची स्टोरी ढापली'; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये सरोगसीचा ट्रॅक, नेटकरी वैतागले
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 10, 2026 10:13 AM

Lagnanantar Hoilch Prem Marathi Serial Track: एकीकडे स्टार प्रवाहवरची (Star Pravah) 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले...' (Mi Savitribai Jyotirao Phule) ही मालिका अवघ्या पाचच महिन्यांत आपला गाशा गुंडाळणार आहे. तर, दुसऱ्या नव्या मालिकाही येऊ घातल्या आहेत. टीआरपीच्या शर्यतीत टकून राहण्यासाठी वाहिनीनं नवी स्ट्रॅटर्जी प्लान केली आहे. पण, अशातच सध्या सोशल मीडियावर स्टार प्रवाहवरच्याच एका मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. स्टार प्रवाहवरच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत (Lagnanantar Hoilch Prem Marathi Serial) मोठा ट्वीस्ट पाहायला मिळतोय. गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत काव्या आणि नंदिनी यांचा प्रेग्नन्सीचा भाग सुरू आहे. त्यात मालिकेच्या कथानकाला दिलेलं वळण पाहून नेटकरी भलतेच वैतागले आहेत. मालिकेचा प्रोमो समोर येताच नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये निर्मात्यांना आणि लेखकाला खडे बोल सुनावले आहेत.  

स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका काही महिन्यांपूर्वी टीआरपच्या यादीत टॉप 3 मध्ये होती. पण, आता मालिकेच्या कथानकात ट्वीस्ट आणून माती केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत काव्या आणि नंदिनी यांचा प्रेग्नन्सीचा भाग  सुरू आहे. त्यातही काव्या अगोदर गरोदर होते. पण, नंदिनीला दिवस जात नाहीत. काही दिवसांनी जेव्हा नंदिनीला दिवस जातात, तेव्हा तिचं मिसकॅरेज होतं आणि ती बाळ गमावते. हे कमी म्हणून नंदिनी आता आई होऊ शकत नाही. मात्र, आता मालिकेत भलताच ट्विस्ट आलाय. नंदिनीच्या बाळाला जन्म देण्यासाठी जीवा दुसऱ्याच मुलीला घरी घेऊन येणार आहे. आता मालिकेत सरोगसीचा ट्रॅक दाखवला जाणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेत सरोगसीचा ट्रॅक (Lagnanantar Hoilch Prem Marathi Serial Surrogacy Track)

टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असणाऱ्या या मालिकेत सध्या जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक टप्पा प्रेक्षक अनुभवत आहेत. एकीकडे काव्या आणि पार्थच्या आयुष्यात बाळाच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच दुसरीकडे नंदिनी मातृत्वाच्या अपूर्ण स्वप्नाशी झुंज देतेय. आई होण्याची तीव्र ओढ, त्यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रत्येक वेळी पदरी पडलेली निराशा यामुळे जीवा-नंदिनीचा प्रवास अधिकच भावनिक बनलाय. अखेर वैद्यकीय सल्ल्यानंतर जीवा आणि नंदिनीनं सरोगसीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या महत्त्वाच्या प्रवासात साथ देण्यासाठी मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेची एण्ट्री होणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुल डॉ. आर्या या भूमिकेतून मालिकेत दाखल होतेय. तिच्या आगमनामुळे कथानकाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी मिळणार असली तरी प्रोमो पाहिल्यानंतर हे कथानक आणि ट्वीस्ट नेटकऱ्यांना चांगलाच खटकल्याचं पाहायला मिळतंय.

'लग्नानंतर होईलच प्रेम'चा प्रोमो पाहताच नेटकऱ्यांचा संताप 

स्टार प्रवाहच्या प्रोमोवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. एकानं उपहासात्मक टीका करत लिहिलंय की, "इतकं नवीन कशाला दाखवायचं? आम्ही असं कधीच नाही पाहिलं... अशीच वाट लावा जीवा आणि नंदिनीची..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, 'काहीही फालतू ट्रॅक दाखवतायत, यांनी तर 'चोरी चोरी चुपके चुपके'ची स्टोरी ढापलीय..." तर, आणखी एकानं लिहिलंय की, "घ्या याला म्हणतात स्वतः पायावर दगड मारणं. जीवा नंदिनी स्वतः च घेऊन आलेत बाहेरवालीला घरामध्ये... मग नंदू ताई म्हणेल, तू आम्हाला बाळ दे, मी माझा पसारेवाला देते..." आणखी एकाने लिहिलं, 'काहीही ट्रॅक करून वाट लावली मालिकेची, कधीकाळी टॉपला होती मालिका...", तर काही नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सरोगसी स्टोरीलाईनवर असलेला सलमान खानचा गाजलेला सिनेमा 'चोरी चोरी, चुपके चुपके'चं नाव लिहिलं आहे.

 

Lagnanantar Hoilach Prem Star Pravah Marathi Serial: स्टार प्रवाहच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्वीस्ट; जीवा-नंदिनीच्या आयुष्यात 'ती' येणार, कथानक कोणतं वळण घेणार?

ABP Majha च्या बातम्या LIVE: 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.