'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
सत्यम सिंह June 10, 2026 02:13 PM

Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai: एकीकडे इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यानं सोसायटीच्या आवारात जैन कुटुंबानं जैन साध्वींसाठी पांढरी पट्टी काढल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं. अखेर प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीमधील पांढरी पट्टी रंगवण्यात आली आणि आपल्याकडून त्यानं हा विषय संपल्याचं जाहीर केलं. पण, आता आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे. नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला असून मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप केला जातोय. सोशल मीडियावर जाहिरातीवरून संतापाची लाट उसळली आहे. 

सध्या एक नोकरीची जाहीरात चर्चेत आली आहे. नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अहमदाबादस्थित भरती एजन्सीकडून वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीत फक्त गुजराती-मारवाडी अर्ज करू शकतात, असा उल्लेख असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य का? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


भरती एजन्सीकडून स्पष्टीकरण

अहमदाबादस्थित भरती एजन्सीकडून आता वादग्रस्त जाहिरातीवर स्पष्टीकरण आलं आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, आमची कंपनी ही रिक्रुटमेंट कंपनी आहे. प्लेसमेंट देण्याचं काम आमच्या कंपनीकडून केलं जातं. विविध कंपन्यांना विविध पदांवर त्यांच्या गरजेनुसार पद भरायची असतात. एखाद्या कंपनीला एखाद्या विशिष्ट जागेसाठी त्या भाषेत ज्ञान असलेला व्यक्ती हवा असेल, त्यानुसार रिक्रुटमेंट कंपनीकडून जाहिरात दिली जाते. आमच्याकडे येणाऱ्या कंपन्यांमध्ये कोणत्याही एका जातीचा किंवा भाषेचा व्यक्ती काम करत नाही विविध भागातून आलेले विविध भाषा बोलणारे लोक कंपन्यांमध्ये काम करतात. त्यामुळे या जाहिरातीचा वेगळा अर्थ घेऊ नये, कंपन्यांच्या गरजेनुसार त्या पदासाठी भाषेची गरज पाहून तशा प्रकारची जाहिरात दिली आहे."

नेमकं प्रकरण काय?

अहमदाबादस्थित भरती एजन्सीकडून नोकरीसाठीची एक वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. फक्त गुजराती-मारवाडी अर्ज करू शकतात, असा उल्लेख नोकरीच्या जाहिरातीत करण्यात आला आहे. सोशल मीडियावर जाहिरातीवरून संतापाची लाट पसरली आहे. या जाहिरातीवरुन मुंबईतील नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य का? असा सवाल उपस्थित केला जातोय. तसेच, मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोपही करण्यात येतोय. 

EGM आणि अकाउंट्स-फायनान्स पदासाठी भरती प्रक्रिया रावण्यात येत आहे, यासाठीची जाहिरात अहमदाबादस्थित भरती एजन्सीकडून नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवर पब्लिश करण्यात आली आहे. या पोस्टसाठी वार्षिक 20 ते 25 लाख रुपयांचे आकर्षक वेतन देण्यात येणार आहे.  नोकरी मुंबईत असणार आहे, मात्र पात्रतेत भाषिक समाजाचा उल्लेख करण्यात आला आहे.  फक्त गुजराती-मारवाडी अर्ज करू शकतात, असा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. 

दरम्यान, सोशल मीडियावर जाहिरातीवरून संतापाची लाट उसळली असून मुंबईकर मराठी तरुणांनी जायचं कुठे? असा सवालही उपस्थित केला जातोय. रोजगार प्रक्रियेत भाषिक भेदभावाचा आरोप करण्यात आलाय. जाहिरातीमुळे पुन्हा मराठी-गुजराती-मारवाडी वाद पेटण्याची शक्यता उद्भवली आहे. तसेच, ही जाहिरात ज्या कंपनीची आहे, त्या संबंधित कंपनी आणि भरती एजन्सीवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. 

 

Prasad Vedpathak White Line Controversy: फक्त एक सोसायटी नव्हे तर अख्ख्या घाटकोपरमध्ये जैन साधू-साध्वींसाठी पांढऱ्या पट्ट्यांच्या पायघड्या, प्रसाद वेदपाठकचा नवा व्हिडीओ व्हायरल

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.