
दृष्टी ही ईश्वराने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. परंतु, जगात असे अनेक लोक आहेत जे अंधत्वामुळे अंधारात जीवन जगत आहेत. अशा लोकांच आयुष्य प्रकाशमान करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नेत्रदान. नेत्रदान हे एक अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र दान मानलं जातं. परंतू जग इतकं पुढे जाऊनही आजही नेत्रदानाबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. आज 10 जून सर्वत्र जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान कोण करू शकते आणि कोण नाही याची सविस्तर माहिती घेऊयात.
कोण करू शकतं नेत्रदान?
लहान मुलांपासून ते अगदी 80 ते 90 वर्षांच्या वृद्धांपर्यत कोणतीही व्यक्ती मरणोत्तर नेत्रदान करू शकते.
हेही वाचा – Oral Health Care : सुंदर हास्य हवंय? मग ओरल हेल्थच्या ‘या’ सवयी जाणून घ्या
चष्मा असलेले लोकही नेत्रदान करू शकतात. ज्यांना दूरचा किंवा जवळचा असा कोणताही चष्मा असलेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात.
ज्या व्यक्तीची मोतीबिंदू किंवा काचबिंदूची शस्त्रक्रिया झाली आहे, अशा व्यक्तींचे डोळेही दान केले जाऊ शकतात.
मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा किंवा क्षयरोग असलेले व्यक्ती नेत्रदान करू शकतात, कारण अशा व्यक्तींचे कॉर्निया सुरक्षित असतो, त्यामुळे हे लोकही मृत्यूनंतर नेत्रदान करू शकतात.
नेत्रदान कोण करू शकत नाही?
तज्ज्ञांच्या मते, सुरक्षेच्या कारणास्तव एड्स, हिपॅटायटीस बी किंवा सी, रेबीज, धनुर्वात किंवा रक्ताचा कॅन्सर असलेल्या मृत व्यक्तींचे डोळे घेतले जात नाहीत. याशिवाय मृत्युसमयी शरीरात गंभीर संसर्ग पसरला असल्यास अशा व्यक्तीचे डोळे दान करता येत नाही.
महत्त्वाची टिप –
नेत्रदान करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. वरील माहिती विविध स्त्रोतावरून घेण्यात आली आहे. my mahanagar live आणि only manini याची पुष्टी करत नाहीत.
हेही वाचा – पावसाळ्यात डोळ्यांना इन्फेक्शनपासून दूर कसे ठेवावे?