लोकप्रिय युट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये दिसलेला अरमान मलिक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच त्याने त्याचा एक ब्लॉग अपलोड केला होता. मात्र या ब्लॉगमधली एक क्लिप प्रचंड व्हायरल होतेय ज्यात तो त्याच्या पत्नीला असं काहीतरी बोलतोय ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींच्या कपड्यांबद्दल त्यांच्याशी बोलतोय. मात्र त्याने ज्या पद्धतीने त्यांच्या कपड्यांबद्दल भाष्य केलंय नेटकरी त्याच्यावर भडकले आहेत. असं तो काय म्हणालाय?
या व्हिडिओमध्ये अरमान त्याच्या दोन्ही बायकांसोबत दिसतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये अरमान पायलकडे तक्रार करतो की त्याने तिच्यासाठी नवीन नाईटी विकत घेतली, पण तरीही ती सकाळी टी-शर्ट आणि हाफ पँट घालून बाहेर आली. त्यावर पायल त्याला उत्तर देताना म्हणते की, ती बाळाची काळजी घेण्यात व्यस्त होती, त्यामुळे तिला तिच्या कपड्यांकडे फारसं लक्ष देता आलं नाही. त्यावर अरमान जे म्हणतो ते ऐकून सगळेच त्याच्यावर संतापलेत.
View this post on InstagramA post shared by Naik Payal (@naik_payal_says)
अरमान त्या दोघींना म्हणतो, 'मी तुझ्यासाठी रोज नवीन कपडे विकत घेणार नाही. तुझ्यावर हे कपडे कसे दिसतायत ते तरी मला दाखव, मग लोक म्हणतात की त्यांचे नवरे त्यांच्यावर प्रेम करत नाहीत. तुम्ही हाफ पँट आणि टी-शर्ट घालून फिरलात तर तुमचे नवरे तुमच्यावर कसे प्रेम करतील? तो दोन महिन्यांत तुम्हाला घटस्फोट देईल. स्वत:ला शक्य तितकं नीटनेटकं ठेवा.'
अरमानचं हे वाक्य ऐकून नेटकरी त्याला चांगलंच सुनावत आहेत. त्याची विचार करण्याची पद्धती कशी आहे हे यावरून सिद्ध होतं असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. चांगले कपडे घातले तरच बायकोवर प्रेम करायचं आणि बाळाची काळजी कुणी घ्यायची? घरातली कामं कुणी करायची? असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारलेत. अरमान मलिकचं खरं नाव संदीप आहे. तो मूळचा हरियाणातील हिसार इथला आहे. त्याने पायल आणि कृतिका या दोघींशी लग्न केलं आहे. त्याला पाच मुलं आहेत.
अर्जुनची डोकेदुखी वाढणार! 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याची 'Tharala Tar Mag'मध्ये एन्ट्री; कोण आहे हा खलनायक?