विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून, आता या भागातील सर्व शाळा ३० जूनपासून सुरू होतील. नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर शिक्षण विभागाने यासंदर्भातील आधीचे परिपत्रक रद्द केले आहे. त्यामुळे उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी शिक्षण विभागाने विदर्भातील शाळा १५ जूनऐवजी २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच २२ ते ३० जूनदरम्यान सकाळच्या सत्रात वर्ग भरविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
Mumbai BMC School Controversy : पालिका शाळांवर अस्तित्वाचे विघ्न, मालाडची शाळा खासगी संस्थेला दिल्याने वादाला सुरुवातया प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने शिक्षण संचालकांनी काढलेल्या आदेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठाचे निर्देश अस्तित्वात असताना २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
दरम्यान, राज्यातील सर्व शाळा एकाच दिवशी सुरू करण्याची भूमिका सरकारतर्फे मांडण्यात आली. मात्र, जर एकसमानता हाच निकष असेल, तर १५ जून किंवा १ जुलैचा पर्याय का विचारात घेतला गेला नाही, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.
Mumbai News: पालिका शाळेत संविधानाचे धडे, शिक्षण समितीसमोर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्तावअखेर शिक्षण संचालकांनी जारी केलेली दोन्ही परिपत्रके रद्द करण्यात आली असून, विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सुमारे २० हजार शाळांमधील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.