बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात भीषण बोट दुर्घटना घडली आहे. भगवान पुरुषोत्तमपुरी या तीर्थक्षेत्री येथील गोदावरी नदीपात्र 50-60 भाविकांनी भरलेली बोट उलटली आहे अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तम यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पुरुषोत्तमपुरी येथे दाखल झाले. तसेच नदी पार करण्यासाठी बोटींचा वापर करत असताना हा अपघात घडला आहे. माहितीनुसार बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. बोट उलटल्यानंतर काही भाविक नदीच्या खोल पाण्यात अडकले. बोट पलटी झाल्यानंतर स्थानिक नागरिक, प्रशासन आणि बचाव पथकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार अधिक मासानिमित्त दर्शनासाठी गेलेल्या ५० ते ६० भाविकांनी भरलेली बोट उलटली. काही भाविकांना सुमारे २० जण सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच इतरांसाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक बोट चालक आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. तसेच काही लहान मुले बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहे
ALSO READ: मुंबई पाणीटंचाई: आता पाणीपुरवठ्यासाठी ओटीपी आवश्यक; चोरी रोखण्यासाठी नवीन प्रणालीचा अवलंब
येथे नदीतून बोटीने दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे. भाविकांची मोठी गर्दी असल्याने बोट चालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचा आरोप आहे. स्थानिक नागरिक, प्रशासन आणि बचाव पथकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
ALSO READ: अकोल्यात नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या; वडिलांचा कॉलेजवर गंभीर आरोप
Edited By- Dhanashri Naik