पुण्यात पुन्हा गोळीबार
नामांकित शाळेवर एकावर गोळीबार
गोळीबारात एक जण जखमी
अक्षय बडवे, साम टीव्ही
पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील शिरूरमध्ये एका गुंडाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना ताजी असताना पुणे शहरातही गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील शिंदे हायस्कुलजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील शिंदे हायस्कूलजवळीवर मेडिकलवर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर रस्त्यावर उभे असलेल्या लोकांची एकच धावाधाव झाली.
Mumbai Crime: मुंबई हादरली! भररस्त्यात गोळीबाराचा थरार, एकाच्या पायात घुसली गोळीशाळेजवळ झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मेडिकलवर गोळीबार झाल्याची माहीती हाती आली आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गोळीबाराने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्यातत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी शिरूरमध्येही गोळीबाराची घटना घडली होती. शिरूरच्या करडे घाटात कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. विशाल काळे असे हत्या करण्यात आलेल्या गुंडाचे नाव होते. शिरूरनंतर आता पुण्यात गोळीबार झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे.