MNS : सर्वांना सूबुद्धी दे, सूड बुद्धी नको, मोदींच्या पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण म्हणून मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरात उपरोधिक पूजा
Tv9 Marathi June 11, 2026 01:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर काल एका नव्या विक्रमाची नोंद झाली. सलग 12 वर्ष देशाचं पंतप्रधान भूषवणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम त्यांनी मागे टाकला. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाली म्हणून देशभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली. अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी या खास उपलब्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेने मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाली म्हणून उपरोधिक पूजा केली.

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मनसेकडून उपरोधिक पूजा आयोजित करण्यात आली होती. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी या पूजेत सहभागी झाले होते. पूजा केल्यानंतर संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्यापासून पळतायत असं तुम्हाला वाटतं का?. “पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्यापासून पळतायत की नाही माहित नाही. पण त्यांचे कार्यकर्ते मात्र पळतायत” असं उत्तर मनसेनेते संदीप देशपांडे यांनी दिलं.

किंवा तुम्ही घाबरता

पत्रकार परिषद घेतली नाही याचा अर्थ काय होतो? “जर तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकत नसाल तर एकतर तुमच्याकडे उत्तरं नाहीत किंवा तुम्ही घाबरता असा त्याचा अर्थ होतो” असं देशपांडे म्हणाले. मोदी असेच विक्रम करत राहिले तर देशाचं काय होईल? “आम्ही बाप्पाला हेच म्हटलं, एवढे विक्रम आपल्या पंतप्रधान साहेबांच्या नावावर आहेत. असेच विक्रम घडवायचे आहेत किंवा काय, आमचा गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. आम्ही त्याच्याकडे प्रार्थना केली की, सर्वांना सूबुद्धी दे, सूड बुद्धी कोणाला देऊ नकोस” असं उत्तर देशपांडे यांनी दिलं.

जॉर्जिया मेलोनी यांनी शुभेच्छा संदेशात काय म्हटलं?

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. “भारतासोबत एका विशेष रणनितीक भागीदारीची सुरुवात करताना आनंद होतोय. यामुळे आपल्या देशांना, देशातील जनतेसाठी नवीन संधी निर्माण होतील” असं जॉर्जिया मेलोनी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.