शिडीं : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी पेढे विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे मारले. पेढ्यांचे नमुने संकलित केले. काही ठिकाणी विकल्या जाणाऱ्या पेढ्यांवर बुरशी आढळल्याने आणि त्याबाबत तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली. हे नमुने तपासणीत खाण्यास अयोग्य आढळल्यास दुकानदारांवर कारवाईचे करण्याचे संकेत या पथकाने दिले. साईंच्या नगरीत विकले जाणारे पेढे या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत.
Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..शिडींत या पेढ्यांना गमतीने चिरंजीव पेढे असे नाव ठेवण्यात आले. कोणी त्यांना साखर पेढे असे संबोधतात. कोणी कुत्र्यांच्या जीवावर उठलेले पेढे म्हणून नावे ठेवतात. भेसळयुक्त पेढे विकणाऱ्यांवर गेल्या पन्नास ते साठ वर्षात एकदाही कडक कारवाई झालेली नाही.
काही दयाळू भाविक हे पेढे कुत्र्यांना खाऊ घालतात. त्यात मोठ्या प्रमाणावर म्हणजे तब्बल सत्तर ते ऐशो टक्के साखर असते. त्यामुळे येथील बऱ्याच कुत्र्यांना मधुमेह होतो. त्यांच्या अंगावरचे केस झजून जातात. जे पेढे कुत्र्यांना वाढतात ते माणसाने खाल्ल्यावर काय होत असेल याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे या साखरपेढ्यांना 'कुत्र्यांच्या जिवावर उठलेले पेढे', असे संबोधले जाते.
येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शिर्डीच्या बाजारपेठेत दररोज दोन ते तीन लाखांची भेसळयुक्त पेढ्यांची विक्री होते. हा पेढा शिर्डी आणि शेजारच्या गावात तयार होतो. त्यात खवा कमी अन साखरेचे प्रमाण सत्तर ते ऐशी टक्के असते. शुध्द पेढा पाचशे रुपये प्रतिकिलो दराने, तर हा साखर पेढा केवळ दोनशे रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो. नफ्याचे प्रमाण दुप्पट असल्याने अपवाद वगळता जवळपास सर्व दुकानात साखर पेक्यांचीच विक्री होते. या पेढ्यांना 'चिरंजीव पेढे' असे संबोधले जाते कारण दुकानदाराकडे पंधरा दिवसांहून अधिक काळ शिल्लक असलेले पेढे पुन्हा परत घेतले जातात. त्यावर प्रक्रिया करून आणि नव्याने त्यात साखर व खवा मिसळून ते नव्या पॅकमध्ये पुन्हा दुकानात येतात. भाविकाने हा पेढा खरेदी केला, तरच त्याला मुक्ती मिळते. तो दुकानात आहे, तोपर्यंत चिरंजीव असतो. पाकिटावर हा पेढा कधी उत्पादीत झाला आणि किती दिवस टिकेल याबाबत कुठलीही माहिती नसते.
सोमवारी सायंकाळी पेठ्यांचे नमुने संकलित केल्यानंतर माहिती देताना अन्न सुरक्षा अधिकारी उज्ज्वला पाटील म्हणाल्या, या पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातील. तपासणी अहवाल आल्यानंतर त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल.
पेढ्यांचे दोन प्रकार
शिर्डीत काही ठरावीक दुकानदार अकोले तालुक्यातील राजूर येथून आणलेला खव्याचा पेहा विक्रीस ठेवतात. त्यात साखरेचे प्रमाण कमी असते. तो चविष्ट असतो. पाचशे रुपये किलो दराने त्याची विक्री होते, तर साखरयुक्त पेठा केवळ दोनशे रुपये किलो दराने विकला जातो.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्तभेसळयुक्त पेढे विक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. पालिकेच्या वतीने देखील हॉटेलच्या रेस्टॉरंटमधील किचनची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तेथे मेसळयुक्त पदार्थ आणि अस्वच्छता आढळल्यास कारवाई केली जात आहे. भाविकांनी शुद्धता तपासून पेढे खरेदी करावे. भेसळयुक्त पेढे विकणान्यांवर कारवाई व्हावी. - डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार