झी मराठीवर अखेर सुरू होतेय 'ती' मालिका; २ वर्षांपूर्वी झालेली घोषणा; नेटकरी म्हणतात- आम्ही नेमकं बघायचं तरी काय?
esakal June 11, 2026 11:45 PM

गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरू झाल्या. या मालिकांमध्ये स्टार प्रवाहच्या मालिकांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ झी मराठीने देखील नवीन मालिकांची घोषणा केलीये. आठवड्याभरापूर्वीच स्टार प्रवाहने आठ नव्या मालिकांची घोषणा केली होती. आता त्यानंतर झी मराठीने त्यांच्या जुन्या मालिकेची शूटिंग सुरू केलीये. या मालिकेची घोषणा झी मराठीने तब्बल २ वर्षांपूर्वी केली होती. त्यामुळे आता प्रेक्षक झी मराठीला प्रश्न विचारत आहेत. कोणती आहे ती मालिका?

झी मराठीने तब्बल २ वर्षांपूर्वी एका इच्छाधारी नागिणीच्या सुडाची कहाणी असणाऱ्या मालिकेची घोषणा केली होती. त्यानंतर झी मराठीवर अनेक मालिका आल्या. मात्र या मालिकेबद्दल कोणतीही अपडेट आली नाही. झी मराठीने हा प्रोजेक्ट बॅकफूटवर टाकला होता. अनेक नव्या येणाऱ्या मालिकांच्या प्रोमोवर प्रेक्षक या मालिकेबद्दल विचारणा करत होते. या मालिकेचं नावच मुळी 'इच्छाधारी नागीण' असं होतं. आता स्टार प्रवाहने काही दिवसांपूर्वी 'मी कात टाकली' या मालिकेची घोषणा केलीये जी नागिणीवर आधारित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा झी खडबडून जागं झालं आणि त्यांनी या मालिकेची शूटिंग सुरू केलीये. या मालिकेच्या सेटवरच्या काही फोटो समोर आलेत.

View this post on Instagram

A post shared by Marathi Serials Official (@marathiserials_official)