उन्हापासून दिलासा मिळवायला गेले, पण काळाने घातला घाला; गंगापूर धरणात चार मुलांचा बुडून मृत्यू
Saam TV June 11, 2026 11:45 PM

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुल आणि एका 21 वर्षीय विवाहित महिलेचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेमुळे नाशिकमध्ये आणि सावरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण गंगापूर धरणाच्या जलाशयात उतरले होते. मात्र पाण्याचा खोलीचा आणि वेगाचा अचूक अंदाज न आल्यामुळे चौघेही पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

DA Hike: मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात वाढ मृतांची नावे खालीलप्रमाणे:

निखिल मच्छिंद्र गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव)

गणेश सुरेश गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव)

साहिल मनोहर गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव)

मयुरी पवन जाधव (वय २१ वर्षे, माहेर: त्र्यंबकेश्वर, सासर: सावरगाव)

Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'

मृत्यू झालेले तिन्ही तरुण आणि महिला हे गंगापूर धरणाजवळच असलेल्या सावरगाव येथील रहिवासी होते. उन्हाचा कडाका किंवा फिरण्याच्या उद्देशाने हे सर्वजण धरणावर गेले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. धरणाच्या पात्रात उतरल्यानंतरअचानक पाण्याचा अंदाज चुकल्याने एकाला वाचवताना दुसरे, अशा पद्धतीने चौघेही जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. एकाच गावातील चार तरुण सदस्यांचा अशा प्रकारे अंत झाल्याने सावरगाव परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शांतता पसरली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.