पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा आणि यंदा पाऊस कमी होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून (१५ जून) शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील वेळापत्रक महापालिका प्रशासनाकडून गुरुवारी जाहीर (Pune Water Cut) करण्यात आले. या वेळापत्रकानुसार पाण्याच्या टाकतून होणाऱ्या ठिकाणांचे दोन भाग करण्यात आले असून या भागांना सम आणि विषम तारखेला हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्या नव्या नियोजनानुसार नागरिकांना पूर्वीच्या वेळेतच पाणी मिळणार असले तरी, पाणीपुरवठा मात्र एक दिवसाआड होईल. कार वॉश, स्विमिंग पूल आणि बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास निर्बंध असणार आहेत. महापालिकेच्या वेबसाईटवर पाणीपुरवठ्याच वेळापत्रक पाहता येणार आहे. (Pune Water Cut)
भाग १: आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, वैकुंठ स्मशान परिसर, समप म भवन, अमर सोसायटी, कोपन गल्ली, मोढ कॉलनी, विठ्ठलवाडी, माकेकर प्लॉट, राजपूत वसाहत, एरंडवणे गावठाण.
वेळ: पहाटे ५.०० ते ११.००
भाग २: मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, वडारवाडी, शिवाजीनगर, रेखवे गल्ली.
वेळ: दुपारी ३.०० ते रात्री ८.००
भाग ३: जनवाडी, जनता वसाहत, वैदूवाडी, गोखलेनगर, श्रमिकनगर, आशानगर.
वेळ: रात्री ८.०० ते ११.३०
भाग ४: बोपोडी.
वेळ: सकाळी ४.०० ते १०.००
भाग ५: चिखलवाडी.
वेळ: रात्री ११.०० ते १.००
भाग ६: एसटीएम, अभिमानश्री सोसायटी, चतु:शृंगी नगर.
वेळ: सकाळी ८.०० ते दुपारी ३.००
भाग ७: बाणेर रोड उजवी बाजू, माळा पाणीपुरवठ्यातील सर्व भाग.
वेळ: दुपारी ११.०० ते ५.३०
भाग ८: औंध गाव, प्रीतम सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत.
वेळ: दुपारी ३.०० ते १०.००
भाग ९: मोरेलगर, अशोकनगर, रेंजहिल, खडकी.
वेळ: दुपारी १.०० ते ५.००
भाग १०: संपूर्ण बालेवाडी गावठाण, बालेवाडी.
वेळ: दुपारी २.०० ते ८.३०
भाग ११: मोहननगर.
वेळ: पहाटे ७.३० ते १२.३०
भाग १२: धाकुडवस्ती, कपिल मल्हार परिसर, बाणेर गावठाण.
वेळ: सकाळी ४.३० ते ८.३०
भाग १३: वीरभद्रनगर, गणराज चौक, बाणेर स्मशानभूमी रोड, पारखी मळा, ज्युपिटर हॉस्पिटल, चाकणकर मळा.
वेळ: संध्याकाळी ५.३० ते २.३०
भाग १४: सुतारवाडी गावठाण, पाषाण पार्क.
वेळ: पहाटे ४.३० ते ७.३०
भाग १५: सुस रोड.
वेळ: सकाळी ११.३० ते १.३०
भाग १६: पंचवटी.
वेळ: दुपारी १२.३० ते ४.००
भाग १७: सुतारगाव.
वेळ: सकाळी ७.३० ते ९.३०
भाग १८: ससे गाव.
वेळ: सम व विषम तारखेला टँकरद्वारे पाणीपुरवठा
भाग १९: खडकी छावणी भाग, मुळा रोड.
वेळ: सकाळी ६.०० ते ११.३०
भाग २०: वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट (ममता स्वीट्स ते विठ्ठल मंदिर रस्त्याची उजवी बाजू ते हायवेपर्यंतचा संपूर्ण भाग), रामनगर, शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे, कोंढवे, औंधकरवस्तीतील लक्ष्मीनगर धाबडे, फक्त लक्ष्मीनगर.
वेळ: पाणी पुरवठ्याचे दैनंदिन वेळापत्रक तसेच राहील, तरीही एक दिवसाआड येईल.
पर्वती एलएलआर, एसएनडीटी, चतुःश्रृंगी, होळकर, विद्यापीठ, चांदणी चौक, बाणेर, म्हाळुंगे, वारजे-माळवाडी, रामनगर, कोंढवे धावडे, शिवणे, श्रीहरी, केदारेश्वर आणि धनकवडी परिसरातील नागरिकांना सम तारखांना पाणीपुरवठा केला जाईल. तर कोथरूड (लक्ष्मीनगर वगळता), बावधन, एरंडवणेचा काही भाग, संतोषनगर, आंबेगाव खुर्द, महादेवनगर, कात्रज गावठाण, सुखसागरनगर, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, सेमिनरी हिल आणि पर्वती दर्शन परिसरांना विषम तारखांना पाणी मिळेल.
आपटे रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, डेक्कन जिमखाना परिसर, मनपा भवन, अमर सोसायटी, कांचनगल्ली, भोंडे कॉलनी, खिलारेवाडी, भालेकर चाळ, रजपूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण, बोपोडी, चिखलवाडी, एनसीएल, अभिमानश्री सोसायटी, चव्हाणनगर, बाणेर रस्ता उजवी बाजू, माऊली पेट्रोल पंपा पर्यंतचा सर्व भाग, औंध गाव, प्रिझम सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत, भोसले नगर, अशोकनगर, रेंजहिल, खैरेवाडी, संपूर्ण बालेवाडी, बालेवाडी गावठाण, मोहननगर, ३.धनकुडे वस्ती, कपिल मल्हार परिसर, बाणेर गावठाण, वीरभद्र नगर, गणराज चौक, बाणेर स्मशानभूमी रस्ता, पारखी मळा, ज्युपिटर हॉस्पिटल, चाकणकर मळा, सुतारवाडी गावठाण, पाषाण पार्ट, सुस रस्ता, पंचवटी, म्हाळुंगे गाव, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, मुळा रस्ता, वारजे माळवाडी.कर्वेनगर पार्ट (ममता स्वीट्स ते विठ्ठल मंदिर रस्त्याची उजवी बाजू ते हायवे पर्यंतचा संपूर्ण भाग) रामनगर, शिवणे उत्तमनगर, न्यू कोपरे, कोंढवे धावडे, कोथरूडमधील फक्त लक्ष्मीनगर, बालाजीनगर – पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, एलोरा पॅलेस परिसर, पवार हॉस्पीटल, परिसर, सर्वे क्रमांक २३/१०, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, किर्लोस्कर सोसायटी, विवेकनगर, श्रीहरी सोसायटी, हिलपॉईट सोसायटी, कोंढवा बुद्रूक, साईनगर, गजानन, महाराजनगर, शांतीनगर, गोकुळ, हॉटेल परीसर, साळवे गार्डन, श्रीकृष्ण कॉलनी, काकडेवस्ती, अर्शफनगर, सर्वे क्रमांक ५, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, अलिफ टॉवर, सावकाशनगर, राजीवगांधीनगर, अप्पर इंदिरानगरचा काही भाग, कोंढवा बुद्रूक गावठाण, लक्ष्मीनगर, वटोबा मंदिर, हागवणे वस्ती, टिळेकरनगर, मेहतानगर, खडी मशीन चौक, पारगेनगर, एच. अँड एम. सोसायटी, कपिलनगर, आंबेडकरनगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, सर्वे क्रमांक १५, पिसोळी रस्ता, येवलेवाडी, कामठेपाटीलनगर, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, कात्रज चौक ते कात्रज दूध डेअरी पर्यंतचा परिसर, भारती विद्यापीठ मागील परिसर, त्रिमूर्ति चौक ते अशोका आगम पर्यंतचा भाग, भारती विद्यापीठ- भारती विहार, श्रीराम निवास, शामाप्रसाद, सावंत विहार, सावंत गार्डन, सिक्ससेंन्स, कांचननगरी, वंडरसिटी, धनकवडी – गावठाण, साईदत्तनगर, कृष्णामाई, सोसायटीशंकरदर्शन सोसायटी, सर्वे क्रमांक २, आदर्शनगर, सह्याद्रीनगर, रामचंद्रनगर, तळजाई ग्रीन सोसायटी, केशव कॉम्प्लेक्स सोसायटी, फाईव्ह स्टार सोसायटी, सर्वे क्रमांक ३४ ते ३७, तळजाई पठार परिसर, साईनगर, खोराड वस्ती, अथर्व नगर, महादेवनगर आनंद विहार फेज १ व २, गौरीशंकर नगर, दामोदरनगर, विश्रांतीनगर, विठ्ठलवाडी, स्काय डेल, हिंगणे खुर्द, तरडे कॉलनी, आशीर्वाद हॉस्पीटल लेन, संतोष हॉल मागील परिसर, प्रगती हायस्कूल परिसर, रामनगर, टेल्कोरस्ता, गंगा भाग्योदय रस्ता, निरंजन पार्क, ब्रम्हा हॉटेलच्या मागील परिसर, शिवसागर सोसायटी, माणिकबाग, सनसिटी रस्ता, दौलतनगर, सुंदर सृष्टी परिसर, सारस्वत बँक परिसर, एकता नगरी परिसर, निंबज नगर, विठ्ठल मंदिर कमान, लिला पार्क, प्रयोजा सिटी, सेरेन काऊंटी, मियामी सोसायटी, नांदेड फाटा, पीएमएवाय सोसायटी, राजयोग, आनंद विहार, सिंहगड रस्ता धायरी, फाटा ते गणेश गार्डन रस्ता उजवी बाजू पुर्ण परिसर, आशा हॉटेल ते दांडेकर पुल उजवी व डावी बाजू पुर्ण, दांडेकर पुल ते मांगीर बाबा चौक डावी बाजू, फरशी पुल, दत्तवाडी परिसर, पानमळा, अगरवाल शाळा, ग्लोबल हॉस्पीटल.