Doctor Sejal Pawar Controversial Comment In Pranit More Show: स्टँड-अप कॉमेडियन (Stand Up Comedian), बिग बॉस (Bigg Boss) फेम प्रणित मोरे (Pranit More) याचे क्राऊड वर्क शो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कार्यक्रमाला आलेल्या एका तरुणानं बिर्याणीवरुन सांगितलेला किस्सा गाजला आणि यामुळेच प्रणित मोरे टीकेचा धनी झाला. एवढा की, त्याला थेट एक निवेदन जाहीर करुन माफी मागावी लागली. ट्रोलिंग एवढं वाढलं की, प्रणित मोरेला त्याचं इन्स्टा अकाउंट डिअॅक्टिव्हेट करावं लागलं. पण, '370 रुपयांची बिर्याणी'चा (Biryani Worth 370 Rupees) वाद पेटलेला असतानाच, प्रणित मोरेच्या शोमधलाच आणखी एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडिओमध्ये डॉक्टर आणि इन्फ्लुएन्सर सेजल पवार (Doctor And Influencer Sejal Pawar) हिनं केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येतोय. या व्हिडीओवरुन रोष एवढा वाढला की, तरुणीनं सर्वांसमोर येत माफीही मागितली. आता याच तरुणीशी संबंधित इन्स्टा चॅट्स व्हायरल (Insta Chats Viral) होत आहेत. ज्यात सेजल पवार (Sejal Pawar) हिनं दोन भारतीय क्रिकेटपटूंना (Indian Cricketers) डेट केल्याचा दावा करण्यात येत आहे. हे स्क्रिनशॉर्ट्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
प्रणित मोरेच्या शोमधला हिमांशु जांगडा (Himanshu Jangda) या तरुणाचा '370 रुपयांची बिर्याणी' हा व्हिडीओ व्हायरल झाला. महिलेला खाऊ घातलेली बिर्याणी वसूल करण्यासाठी काय काय केलं, याचं वर्णन हिमांशुनं अत्यंत अश्लील शब्दांत केलेलं. या तरुणानं मांडलेलं मतावरुन अनेकांनी जोरदार ट्रोल केलं. तसेच, काहींनी महिलांबाबतचं असं आक्षेपार्ह्य मत ऐकून संताप व्यक्त केला. '370 रुपयांची बिर्याणी' व्हिडीओवरुन जोरदार ट्रोलिंग सुरू झालं. अनेकांनी हिमांशु जांगडासोबतच प्रणित मोरेलाही फैलावर घेतलं. प्रणितनं यासंदर्भात एक निवेदन जाहीर करुन माफीही मागितली आणि या प्रकरणी आपली बाजू मांडली. पण, आता '370 रुपयांची बिर्याणी' व्हायरल व्हिडीओनंतर कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील आणखी एक व्हिडीओ चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये डॉक्टर आणि इन्फ्लुएन्सर सेजल पवार हिनं अवयवदान केलेल्या मृत व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्ट्सवरुन अश्लील भाषेत टिप्पणी केलेली. बिर्याणीच्या व्हिडीओनंतर डॉक्टर तरुणीच्या व्हायरल व्हिडीओवर सोशल मीडियात संतापाची लाट उसळली आहे. वाढत्या वादानंतर डॉक्टर सेजल पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली, आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींवरुन चर्चा सुरू आहे.
डॉ. सेजल पवारनं क्रिकेटपटूंना केलंय डेट? (Dr. Sejal Pawar Has Dated Cricketers?)
प्रणित मोरेच्या शोमध्ये मृत व्यक्तीच्या शरीरावर अश्लील भाषेत केलेल्या टिप्पणीवरुन टीकेची धनी झालेली डॉक्टर तरुणी आता क्रिकेटपटूंसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. प्रणितच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यांबद्दल डॉ. सेजल पवारनं माफी मागितली. पण हा विषय इथेच थांबला नाही. सध्या सेजल पवारशी संबंधित कथित चॅट्स आणि जुने स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, सेजलचा क्रिकेटर पृथ्वी शॉ सोबतचा एक फोटोही व्हायरल होत आहे. त्यामुळे चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. सेजलनं क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) यांना डेट केल्याची चर्चा आहे. रेडइटवर सेजलच्या फ्रेंड्सचे कथित चॅट्सचे स्क्रीनशॉट्स आणि ओडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. डॉ. सेजलनं अनेक क्रिकेटपटूंना डेट केल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच, त्या चॅट्समध्ये सेजलनं अनेकांना चिट केल्याचा दावाही करण्यात आलाय.
डॉ. सेजल पवार ज्या रुग्णालयात शिकत होती, तिथेच माझा मित्रदेखील शिकत होता, असा उल्लेख चॅटमध्ये आहे. "माझा मित्र केईएमध्ये शिकतो. त्यांच्या कॉलेज ग्रुपमध्ये गेल्या वर्षी हे चॅट्स व्हायरल झालेले... तिनं अनेक तरुणांची फसवणूक केलीय... ती लोकांना टिश्यू पेपरसारखं वापरते...", असा उल्लेख चॅट्समध्ये आहे.
केईएम रुग्णालयाकडून डॉक्टर तरुणीच्या वक्तव्याप्रकरणी चौकशीचे आदेश (KEM Hospital Inquiry Statement Made By Sejal Pawar)
डॉक्टर सेजल पवारनं आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी माफी मागितली असली तर हे प्रकरण त्यांना भोवणार असंच दिसतंय. केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानं सेजल यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. त्यासाठी रुग्णालय आणि महाविद्यालय प्रशासनाकडून दोन सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आलीय. संबंधित व्हिडीओ तसंच त्यातील कथित वक्तव्यांची या समितीकडून पडताळणी केली जातेय. शक्य तितक्या लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना चौकशी समितीला देण्यात आल्यात.
ABP Majha च्या बातम्या LIVE: