Amravati Politics: अमरावतीत काँग्रेस वंचित बहुजनच्या उमेदवारास पाठिंबा देणार; स्थानिक नेत्यांच्या बैठकीत एकमत, आज घोषणा होण्याची शक्यता
esakal June 12, 2026 11:45 AM

अमरावती : अमरावती विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात आता काँग्रेस वांची बहुजन आघाडी च्या उमेदवारास समर्थन देण्याच्या निर्णयाप्रत आली आहे.रात्री खासदार बळवंत वानखडे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Zojila Tunnel: ‘झोजिला बोगद्या’ची दोन्ही टोके जोडली! सहा वर्षांच्या अथक चिकाटीने कारगिल-लडाख जवळ; काम निर्णायक टप्प्यावर

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी अघोषित माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आज रात्री काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला खासदार बळवंत वानखडे यांच्यासह निरीक्षक यशोमती ठाकूर, माजी आमदार डॉ सुनील देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप,जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, मनपातील विरोधी पक्षनेते विलास इंगोले उपस्थित होते.

हर्षजीत देशमुख यांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती वर चर्चा करण्यात आली.वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निलेश विश्वकर्मा याना समर्थन देण्यावरही चर्चा करण्यात आली.जवळपास विश्वकर्मा याना पाठींबा देण्यावर या नेत्यांचे एकमत झाल्याचे समजते.

Shirdi Railway Station: साईभक्तांसाठी मोठी खुशखबर! कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी रेल्वे स्थानकाचा कायापालट हाेणार, ६० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

तथापि हा निर्णय प्रदेशाध्यक्ष याना कळविण्यात येणार असून अंतिम निर्णय त्यांचा राहणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान काँग्रेस समोर अन्य पर्याय नसल्याने निलेश विश्वकर्मा याना पाठींबा जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवारी दुपारपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.