प्रणित मोरेच्या 'शो' बाबत मोठा निर्णय होणार, मुंबईच्या महापौरांचा संताप; डॉ.सेजल पवारच्या अश्लील टिपण्णीवर अॅक्शन मोडमध्ये
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 12, 2026 08:13 PM

Mayor Ritu Tawde on Pranit More Controversy: प्रणित मोरे (Pranit more) सध्या आपल्या शोमुळे आणि ऑडियन्सने शेअर केलेल्या प्रतिक्रियेमुळे गोत्यात अडकला आहे.  हिमांशू जांगडा या ऑडियन्समध्ये (Social Media) बसलेल्या तरुणानं एका तरुणीला डेट करतानाच अनुभव सांगितला.  त्यानं महिलेबद्दल केलेल्या अश्लील टिप्पणीमुळे हा वाद वाढत गेला. यानंतर डॉ. सेजल पवार हिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. तिनं प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबाबत अश्लील टिप्पणी केली.  यामुळे तिच्याही अडचणीत वाढ झाली आहे.  दरम्यान, हे प्रकरण चिघळत असताना मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.  या प्रकरणासंदर्भात रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असल्याचं सांगितलं. 

रितू तावडे म्हणतात, 'कॉमेडी शोमध्ये केईएम हॉस्पिटलची स्टूडेंटनं जे स्टेटमेंट केलं आहे. ते वक्तव्य अतिशय घाणेरडे आहे. तुमच्या शिक्षणासाठी ज्यावेळी शवविच्छेदनासाठी  एखादी बॉडी त्याठिकाणी नेली जाते, तेव्हा तुम्ही यावर आक्षेपार्ह विधान करता, पुरूषाची असूद्या किंवा स्त्रीची बॉडी, हे तुमच्या संस्कृतीला शोभा देणारं नाही', असं रितू तावडे यांनी डॉ. सेजल प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही माफी मागता, पण तुम्ही जे एकदा बोलता, तुम्ही काय आहात अन् तुम्ही कुठल्या संस्कृतीचे आहात, याचे उदाहरण तुम्ही या ठिकाणी देत आहात', असंही रितू तावडे म्हणाल्या. 

'वाईट वाटतं, जेव्हा आई - वडील तुम्हाला  कर्ज काढून शिक्षण देतात. मुंबईसारख्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळणं खूप कठीण असतं. कोट्यवधी रुपये खर्च करुन तुम्हाला यासाठी पाठवतात का?', असा प्रश्न रितू तावडे यांनी प्रश्न उपस्थित केला. 'तुम्ही अशाच पद्धतीने खालची पातळी ओलांडून बोलता,  पण या ठिकाणी तुम्ही मर्यादाच सोडल्या आहेत. मुंबई शहरात स्टँड अप कॉमेडी शो बंद झाला पाहिजे, याचा माझा विरोध आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना मी यासंदर्भात पत्र पाठवणार आहे.  आता यावर तुम्हाला माफी मिळणार नाही. चुकीला माफी नाही', असं रितू तावडे यांनी म्हटलं.

डॉ. सेजल पवार हिच्या अडचणीत वाढ (Doctor Sejal Pawar Suspension News)

मृतदेहासंबंधित केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे के ई एम महाविद्यालयात शिकत असलेली डॉ.सेजल पवार हिच्या अडचणीत वाढ होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.सेजल पवारवर महाविद्यालयातून निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. 

अवयवदान आणि मृतदेह संबंधी केलेल्या शो मधील वक्तव्यामुळे के ई एम महाविद्यालयात शिकत असलेली डॉ. सेजल पवारवर महाविद्यालयाकडून लवकरच काही दिवसांच्या महाविद्यालयातून निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. डॉ.सेजल पवारनं त्या कार्यक्रमात जे वक्तव्य केलं, त्यामुळे समाजातील घटकांच्या भावना दुखावल्या आहेत. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल के ई एम रुग्णालय प्रशासनाने घेतली असून, त्यासंबंधीचा अहवाल आज रात्रीपर्यंत दोन सदस्य समितीकडून मागविण्यात आला आहे.

चौकशी समितीचा रिपोर्ट आज रात्री डीनकडे पाठवण्यात येणार (Doctor Sejal More in Pranit More Show)

हा सगळा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उद्या यासंबंधीत कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. ज्यामध्ये काही दिवसांसाठी डॉ. सेजल पवार हिला कॉलेजमधून निलंबित केलं जाणार आहे. कॉलेज प्रशासनाने तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतलं असून, उद्या तिच्या कारवाई संबंधीचा निर्णय आई-वडिलांकडे दिला जाणार असल्याची माहिती आहे. चौकशी समितीचा रिपोर्ट आज रात्री डीनकडे येईल, त्यानंतर तिला काही दिवसांसाठी निलंबित केले जाणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पूनम पांडेनं प्रणित मोरेला चांगलंच झापलं; तुमच्या 370 रुपयांच्या बिर्याणीपेक्षा जास्त महाग असतात आमचे...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.