राज्यात मान्सूनची प्रगती सध्या मंदावली
अनेक भागांत उकाडा वाढला
विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट
कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे
पूर्व विदर्भात पावसाचा येलो
Maharashtra Weather Update News राज्यात अद्यापही मान्सूनचे आगमन पूर्णपणे झाले नसल्याने नागरिकांना उकाडा आणि वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने आज विदर्भातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा धोका असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यातील इतर भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात मान्सूनचा (Maharashtra Monsoon Rain) प्रवास सध्या मंदावलेला आहे. नैऋत्य मोसमी वारे कोकणातील (Kokan Monsoon) हर्णे-दापोली परिसरापर्यंत पोहोचले असले तरी पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण नसल्याने मान्सूनची प्रगती थांबली आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक शहरांमध्ये उष्णतेचा त्रास वाढला आहे. मुंबईत (Mumbai Monsoon) कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे.
Monsoon Update : मुंबईत मान्सूनचा लेटमार्क! 'या' तारखेला दाखल होणार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज काय? वाचाहवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आज विदर्भाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला असून वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोकण, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि विदर्भातील अकोला, अमरावती येथे उष्ण आणि दमट हवामान वर्तवण्यात आले आहे. तसेच पूर्व विदर्भासह काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
Shocking : संतापजनक! शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीकडे प्रायव्हेट फोटो मागितले; ब्लॅकमेल करत बलात्कार केलादरम्यान, यंदाच्या मान्सूनवर प्रशांत महासागराच्या पोटात खवळणाऱ्या एल निनोचा (El Nino Strom) प्रभाव पडत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. एल निनोमुळे देशातील काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, तर काही भागांत पावसाचे (Rain In Maharashtra) आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम शेतीसंबंधित कामांवर होणार आहे.