‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सुरज चव्हाण याच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सुरज आणि त्याची पत्नी संजना हे आई-बाबा होणार असून,अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने ही गुड न्यूज नुकतीच शेअर केली होती. बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकरने तिची चोर ओटी भरली, त्याचा व्हिडीओ तिने शेअर केला होता. त्यानंतर ही बातमी सर्वांनाच समजली. सुरजनेही त्याच्या वॉलवर व्हिडीओ चटाकत सर्वांना गुड न्यूज दिली. त्यानंतर आता जान्हवीने आता आणखी एक गोड व्हिडीओ शेअर केला, तो सुरज-संजनाच्या डोहाळेजेवणाचा. (All Photos : Social Media)
जान्हवीने प्रेमाने त्यांची नजरही काढली. तिचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत भावी आई-बाबांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये लग्न केलं. अत्यंत थाटात हा विवाह पार पडला होता. संजना ही सूरजची मामेबहीण आहे. या दोघांच्या लग्नालाही जान्हवी आवर्जून उपस्थित होती, हळद, मेहंदी, लग्नाचे फोटो, व्हिडीओ तिने शेअर केले होते. बिग बॉस मराठी सीझन 5 च्या काही मंडळीनीही लग्नाला हजेरी लावली होती.