शिंदेच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंची चिंतावाढली, मातोश्री येथे तातडीची बैठक बोलावली
Webdunia Marathi June 13, 2026 02:45 PM

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठ्या बंडाच्या चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे खळबळ उडाली असून, उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे तातडीची बैठक बोलावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन टायगरसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी १४ जून रोजी मातोश्री येथे आपल्या सर्व खासदारांची एक महत्त्वपूर्ण आणि तातडीची बैठक बोलावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात 'ऑपरेशन टायगर' या नावाची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात असा दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे गटातील खासदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एका रणनीतीवर काम करत आहे. शिंदे गटातील नेत्यांचा दावा आहे की, उद्धव गटातील अनेक खासदार त्यांच्या संपर्कात असून लवकरच एक मोठा राजकीय स्फोट होऊ शकतो.

ALSO READ: चंद्रपूरच्या सावली तालुक्यात ३० हातींचा कळप दाखल झाला; प्रशासन सतर्क

तसेच माहिती समोर अली आहे की, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका सभेत उद्धव गटातील नऊपैकी सात खासदार उपस्थित होते, ज्यामुळे राजकीय तणाव वाढला आहे. वृत्तानुसार, जाधव काही काळापासून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ठाकरे गटाच्या काही महत्त्वाच्या सभांना ते अनुपस्थित राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने परभणी जिल्हा संघटनेत काही मोठे बदल केले आहे.

ALSO READ: मान्सूनचा रौद्र अवतार! आज कोकणासाठी रेड अलर्ट जारी

Edited By- Dhanashri Naik
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.