Pranit More Earning : सोशल मीडियाच्या जगात रातोरात प्रसिद्धी मिळवणं जितकं सोपं, तितकाच त्यात वादात अडकण्याचा धोकाही असतो. स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे सध्या एका मोठ्या वादात सापडला आहे; त्याच्या एका शोमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार घडला. गुरुग्राममधील एका तरुणासोबतच्या त्याच्या संभाषणाचा व्हिडिओ ऑनलाइन समोर येताच लोकांचा संताप अनावर झाला. ‘370 की बिरयानी’ (370 ki biryani) या वादामुळे त्या तरुणाला आपली नोकरी गमवावी लागली, तर सेजल पवार या एमबीबीएसच्या तरूणीने मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर केलेल्या कमेंटमुळे तीही अडचणीत सापडली. आणि हा सगळा प्रकार ज्याच्या शोमध्ये झाला, तो कॉमेडिअन प्रणित मोरेविरुद्धही एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असल्याने तोही अडचणीत सापडलाय. या सर्व गदारोळानंतर प्रणित मोरे यांची लाइफस्टाइल आणि कमाई यांबाबत बरीच चर्चा होत आहे. वादग्रस्त प्रणित मोरे एका शोमधून नेमके किती पैसे कमावतो आणि आतापर्यंतचा त्याचा करिअरचा प्रवास कसा होता, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. (All Photos : Instgram)
370 रुपयांची बिर्याणी या संपूर्ण वादाची सुरूवात प्रणित मोरेच्या एका लाइव्ह स्टँडअप कॉमेडी शो दरम्यान झाली. कार्यक्रमादरम्यान, गुरुग्राममधील हिमांशू जांग्रा या तरुणाने सांगितलं की, तो एका तरुणीसोबत ‘डेट’वर गेला होता. त्याने तिच्यासाठी 370 रुपयांची बिर्याणी घेतली आणि त्याबदल्यात त्याला तिच्याकडून शारीरिक संबंधांची अपेक्षा होती. तिची संमती नसतानाही त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता, हे त्याने सर्वांसमोर कबूल केले. या अश्लील आणि गंभीर टिप्पणीवर त्वरित आक्षेप घेण्याऐवजी किंवा ती थांबवण्याऐवजी, कार्यक्रमाचा सूत्रसंचालक प्रणित मोरे हसत राहिला आणि केवळ एक विनोद असल्याचे सांगून त्याने त्याला प्रोत्साहन दिले.
या मोठ्या वादानंतर, प्रणित मोरे यांची लाइफस्टाइल आणि कमाई याबाबत बरीच चर्चा होत आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, प्रणित मोरे याच्या ‘लाइव्ह शो’साठी कोणतेही निश्चित मानधन किंवा तिकिटांमधून मिळणारे ठराविक उत्पन्न नसते. तरीही, एका ‘स्टँड-अप शो’ किंवा ‘लाइव्ह इव्हेंट’मधून तो सहजपणे 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतची कमाई करतो, असा अंदाज आहे. तिकिटांची मागणी आणि कार्यक्रमस्थळ यांनुसार त्यांच्या या कमाईत चढ-उतार होत असतात.
या मोठ्या वादानंतर, प्रणित मोरे यांची लाइफस्टाइल आणि कमाई याबाबत बरीच चर्चा होत आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, प्रणित मोरे याच्या ‘लाइव्ह शो’साठी कोणतेही निश्चित मानधन किंवा तिकिटांमधून मिळणारे ठराविक उत्पन्न नसते. तरीही, एका ‘स्टँड-अप शो’ किंवा ‘लाइव्ह इव्हेंट’मधून तो सहजपणे 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतची कमाई करतो, असा अंदाज आहे. तिकिटांची मागणी आणि कार्यक्रमस्थळ यांनुसार त्यांच्या या कमाईत चढ-उतार होत असतात.
इंटरनेट आणि लाइव्ह एंटरटेनमेंट (थेट सादरीकरण) क्षेत्रांमधील सातत्यपूर्ण कार्यामुळे प्रणित मोरेने बऱ्यापैकी संपत्ती कमावली आहे. विविध मीडिया रुपोर्टनुसार, त्याची एकूण संपत्ती 4 ते 8 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. वाद निर्माण होण्यापूर्वी त्याच्या कारकिर्दीचा आलेख वेगाने उंचावत होता हेच त्याच्या आकडेवारीतून दिसून येतं.
आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेल्या प्रणित मोरेची कारकीर्द अत्यंत सामान्य पातळीवरून सुरू झाली. त्याने आपल्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात एका ऑटोमोबाईल शोरूममध्ये ‘सेल्स एक्झिक्युटिव्ह’ म्हणून केली. त्यानंतर, ‘रेडिओ मिर्ची’वर आरजे (RJ – रेडिओ जॉकी) म्हणून काम करताना त्याने आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याचा मासिक पगार केवळ 11 हजार रुपये होता. आरजे म्हणून काम करत असतानाच त्याला विनोद आणि अँकरिंगमधील बारकावे आत्मसात करण्याची संधी मिळाली.