ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर कडाडले! ‘या’ कारणांमुळे सराफा बाजारात तेजी, जाण
Marathi June 13, 2026 03:25 PM

नवी दिल्ली: देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold-Silver Rate) कालच्या तुलनेत तेजी पाहायला मिळत आहे. दिल्लीत आज सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १४,८५३ रुपये आहे, तर मुंबईत हा दर प्रति ग्रॅम १४,८५९ रुपये इतका आहे. आज १३ जून, शनिवार रोजी भारतातील सराफा बाजारात गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Rate) पुन्हा वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांकडून वाढलेली मागणी यांमुळे या मौल्यवान धातूंच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली आहे.(Gold-Silver Rate)

Gold-Silver Rate: सोन्याचे आजचे दर (प्रति १० ग्रॅम)

आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४८,५८० रुपये आहे. तसेच, दागिने बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३६,२०० ते १,३७,२३० रुपये दरम्यान आहे. याच क्रमाने १८ कॅरेट सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम १,११,४५० ते १,१२,४२० रुपये इतका आहे.(Gold-Silver Rate)

Gold-Silver Rate: प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

दिल्ली: १,४९,३२० रुपये

मुंबई: रु. 1,49,580

कोलकाता: रु. 1,49,380

चेन्नई: १,५०,०२० रुपये

हैदराबाद: 1,49,820 रु

अहमदाबाद: रु. 1,49,780

पाटणा: रु. 1,48,910

Gold-Silver Rate: चांदीचे दरही वधारले

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. आज चांदीचा दर प्रति ग्रॅम 260.10 रुपये इतका आहे. त्यानुसार एक किलो चांदीचा भाव सुमारे 2 लाख 60 हजार रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.

Gold-Silver Rate: किमती वाढण्यामागची मुख्य कारणे

१. अमेरिका-इराणमधील युद्ध टळण्याची शक्यता:

नुकतेच अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ले रोखण्याचे आदेश दिले असून चर्चेचे संकेत दिले आहेत. यामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता काहीशी कमी झाली आहे. परिणामी गुंतवणूकदारांचा विश्वास परतला असून, आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतीय कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीच्या फ्युचर्समध्ये (वायदा बाजार) मोठी खरेदी सुरू झाली आहे.

२. बेस इम्पोर्ट प्राईसमध्ये मोठी कपात:

सरकारने सोन्याची बेस इम्पोर्ट प्राईस (पायाभूत आयात मूल्य) ८० डॉलरने कमी करून १३४३ डॉलर प्रति १० ग्रॅम केली आहे, तर चांदीची बेस इम्पोर्ट प्राईस २७६ डॉलर प्रति किलोने घटवली आहे. यामुळे आयातदार आणि मोठ्या ज्वेलर्ससाठी आयातीचे मूल्यमापन अनुकूल झाले असून, देशांतर्गत बाजारातील सेंटिमेंट्स मजबूत झाले आहेत आणि मागणी वाढली आहे.

३. मोठ्या घसरणीनंतर खालच्या स्तरावर खरेदी (Dip Buying):

गेल्या काही दिवसांत भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली होती. सोन्याचे भाव जेव्हा अशा प्रकारे खाली येतात, तेव्हा गुंतवणूकदार आणि ज्वेलर्स याला खरेदीची उत्तम संधी मानून मोठ्या प्रमाणावर ‘डिप बाइंग’ (कमी दरात खरेदी) सुरू करतात. यामुळे किमती पुन्हा वाढू लागतात.

४. व्याजदरात कपातीची अपेक्षा:

ग्लोबल मार्केटमध्ये पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे की, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करू शकते. व्याजदर कमी होण्याच्या आशेमुळे डॉलर काहीसा कमकुवत होऊ शकतो. जेव्हा डॉलर कमकुवत होतो, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीची जागतिक मागणी आणि किमती या दोन्हीमध्ये वाढ होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.