बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसा मागे अधिवेशन झालं. या अधिवेशनात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बोलताना म्हणाले मी बारावा प्लेयर आहे. यावेळी बोलताना त्यांनी सूर्यकुमार यादवचा रेफरन्स देखील दिला होता. सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप जिंकून देखील त्याला बाहेर काढण्यात आलं होतं, यावरती प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले, धनंजय मुंडे हे बारावे प्लेयर नाहीत. आम्हा ओबीसींच्या दृष्टिकोनातून मुंडे (Dhananjay Munde) ओपनिंगचे बॅट्समन आहेत, आणि ते फक्त ओपनिंगचे बॅट्समन नाहीत तर ते ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मुंडे साहेबांना (Dhananjay Munde) मी एकच सांगेन, तुमची लाईन आणि लेन्थ व्यवस्थित ठेवा, चढउतार येत असतात, कुठल्याही खेळाडूच्या जीवनात हा फॉर्म कधी कमी असतो, कधी जास्त असतो पण फॉर्म गवसला की, तो देशाला विजय मिळवून देणार असतो. त्यामुळे मुंडे साहेब तुम्ही टीमला विजय मिळवून देणारे आहात. आम्ही ओबीसी त्यांची वाट पाहत आहोत, बारावा खेळाडू वगैरे सगळं सोडून द्या, ओबीसी बांधवांचा विश्वास तुम्ही जिंकलात तर बारा खेळाडू कोणाला बनवायचं हे बनवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही असं काही म्हणू नका, तुम्ही ओपनिंग बॅट्समन आहात, ओबीसी पक्ष तुमच्या मागे ठामपणे उभा राहील, असंही हाकेंनी (Laxman Hake) म्हटलं आहे.
तर भुजबळ साहेबांनी (Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, तेव्हापासून भुजबळ साहेब पवारांची पाठराखण करत आहेत, पवारांसोबत काम करत आहेत. त्यांच्या राजकीय कामाच्या जोरावरती एक ओबीसीच्या चेहरा म्हणून काम करत आहेत, साहेबांनी आजपर्यंत राष्ट्रवादीला फायदाच करून दिला, त्यामुळे त्यांच्या पक्षातील एखादा पद त्यांना दिलं हे त्यांच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट नाही. पण भुजबळ साहेब (Chhagan Bhujbal) असो किंवा मुंडे साहेब, तुम्ही असे कोणाला तरी भीक मागणारे, आम्हाला खासदारकी द्या किंवा मी बारावा खेळाडू आहे, असं हे सगळं म्हणण सोडून द्या, तुम्ही खूप मोठ्या जनतेचे अपिलिंग काम करा, तुम्ही टीम ठरवू शकाल, खासदारकी, बारावा खेळाडू हे सगळं सोडा. भुजबळ साहेब तुम्ही खासदारकी वाटणारी माणस आहात. ओबीसी बांधवांना या गोष्टी आवडत नाहीत, ओबीसी बंधू प्रचंड संतापलेला आणि चिडलेला आहे. अशा वेळी जर तुम्ही या लोकांना जर आम्हाला काही पाहिजे असं काही बोलत असाल, तर तो चुकीचा मेसेज आहे. त्यामुळे भुजबळ असो, मुंडे असोत किंवा भाजपमधील आणखी कोणी ओबीसी नेते असोत, या महाराष्ट्राचं राजकारण ओबीसींच्या वाड्या वस्त्याशिवाय होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही अशी भाषा वापरू नका, पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडा, ओबीसी वाट बघत आहे, ओबीसीचा जन आंदोलन या महाराष्ट्रात उभे राहते, ज्या दिवशी ओबीसी खडा तो सबसे बडा त्यामुळे तुम्ही सगळेजण जागे व्हा आणि अशी भीक मागायची बंद करा. भुजबळ साहेब, मुंडे साहेब तुम्ही पट्टीचे खेळाडू आहात, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे रहा, ओबीसी बांधव पुढच्या वेळी ठामपणे ही टीम पण बदलणार आहे असंही पुढे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांचे कौतुक करताना म्हटले की, “राजकारणात चढ-उतार येत असतात. मात्र मुंडे हे विजय मिळवून देणारे खेळाडू आहेत. ओबीसी समाजाचा विश्वास जिंकण्याची त्यांच्यात क्षमता आहे. इतकेच नव्हे, तर 12 खेळाडू कोणाला बनवायचे ही तुमची ताकद आहे कोण असावा हे ठरवण्याची ताकदही त्यांच्याकडे आहे.” तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या राजकीय वाटचालीचाही यावेळी उल्लेख करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून पक्षासाठी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे त्यांना एखादे पद देणे ही फार मोठी गोष्ट नाही, असे मत व्यक्त केले आहे.
यावेळी भुजबळ आणि मुंडे या दोघांनाही पदांसाठी मागणी करण्याच्या राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. “तुम्ही कोणाकडे पदांसाठी भीक मागणारे नाही. आम्हाला पद द्या, आम्हाला बारावा खेळाडू करा, अशी भूमिका सोडून द्या. तुम्ही ओबीसी समाजासाठी मोठे काम करू शकता आणि सक्षम नेतृत्व घडवू शकता,” असे वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.छगन भुजबळ यांना उद्देशून बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं की, “भुजबळ साहेब, तुम्ही खासदारकी वाटणारे नेते आहात. त्यामुळे आगतिक होऊ नका. ओबीसी समाजालाही अशी भूमिका आवडत नाही,” असे त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ एका समाजाच्या आधारावर चालू शकत नाही, याची जाणीव सर्व नेत्यांनी ठेवली पाहिजे, असे मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे. “भुजबळ असोत किंवा धनंजय मुंडे, महाराष्ट्राचे राजकारण फक्त ओबीसींचे होऊ शकत नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे,” असंही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार अन्न त्याग आंदोलनावर बोलताना लक्ष्मण हाकेंनी म्हटलं की, रोहित पवाराच्या आंदोलनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. रोहित पवारांनी आठवड्याभर आंदोलन करावं, पोलिसांनी त्यांना चांगलं प्रोटेक्शन द्यावं, पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी बसणं म्हणजे मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखे आहे. ज्या पवारांनी शिक्षण संस्था नावावर करून घेतल्या महाराष्ट्राचा सातबारा नावावर करून घेतल्या त्या पवारांचा वारस आंदोलन करत आहे हे हास्यस्पद आहे, अशी टीका हाकेंनी केली आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादीचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये लवकर करावं. यांच्यामागे जनाधार उरलेला नाही, आपण राष्ट्रवादीच्या नावावर निवडणुका लढवायला गेले तर मागे कोणी नाही. याची शरद पवारांना जाणीव झाली आहे. काँग्रेसच्या उरल्या सुरल्या जनाधारकात काही करता येतं का याचा प्रयत्न आहे. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये लवकरात लवकर लवकर जावं. मग कळेल जनता कोणाच्या मागे आहे.
कारखानदारांचं नेतृत्व करून जनाधार वाढत नसतो पवार साहेब, असंही हाकेंनी म्हटलं आहे.