Livano Comenencia fires Curacao Enters World Cup History Books: माजी वर्ल्ड कप विजेत्या जर्मनीने फिफा फुटबॉलवर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी क्युरासाओ या कॅरेबियन बेटावरील लहान देशावर ७-१ असा दणदणीत विजय मिळवला. वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात झालेला हा वर्ल्ड कप स्पर्धेतील ७२ वर्षानंतरचा सर्वात मोठा पराभव ठरला. यापूर्ली १९५४ मध्ये हंगरीने ९-० अशा फरकाने दक्षिण कोरियावर विजय मिळवला होता. पण, या सामन्यात जर्मनीच्या ७ गोलपेक्षा क्युरासाओच्या एका गोलची जगभर चर्चा आहे.
FIFA World Cup मध्ये दरवेळी चमत्कार घडतात आणि जे फुटबॉल चाहत्यांच्या कायमचे स्मरणात राहतात. असाच एक अविश्वसनीय आणि अंगावर काटा आणणारा क्षण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळाला आहे. जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या क्युरासाओ या संघाने थेट ४ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन जर्मनी संघाविरुद्ध खेळताना वर्ल्ड कप इतिहासातील त्यांचा पहिला वहिला गोल करून इतिहास रचला. २२ वर्षीय लिव्हानो कोमेनेशिया ( Livano Comenencia) याने २१ व्या मिनिटाला हा गोल केला.
FIFA WORLD CUP 2026: मृत्यूला हरवून 'तो' मैदानावर उतरला; वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल करताच ढसाढसा रडला... कोण आहे Raúl Jiménez?कॅरेबियन समुद्रातील एक अतिशय लहान देश असलेला क्युरासाओ, हा तांत्रिकदृष्ट्या नेदरलँड्स साम्राज्याचा भाग आहे. या संपूर्ण देशाची एकूण लोकसंख्या अवघी १ लाख ५० हजार च्या आसपास आहे, मुंबईतील डोंबिवली किंवा ठाणे, यांच्यापेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या या देशाने वर्ल्ड कपची पात्रता फेरी पार करून थेट मुख्य स्पर्धेत धडक मारली आणि तिथे गोलही केला, हा एक चमत्कारच मानला पाहिजे.
क्युरासाओच्या अनेक खेळाडूंकडे डच नागरिकत्व असते आणि त्यामुळे या संघातील बहुतांश खेळाडू हे नेदरलँड्समधील प्रसिद्ध 'एरेडिव्हिझी' लीग किंवा युरोपमधील इतर मोठ्या क्लब्समध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळतात. त्यांच्याकडे प्रतिभा ठासून भरलेली आहे, फक्त त्यांना जागतिक पातळीवर एकत्र येऊन खेळण्याची संधी फुटबॉल वर्ल्ड कपमुळे मिळाली.
पॅट्रिक क्लुइव्हर्ट यांच्या आगमन, हा क्युरासाओच्या फुटबॉल इतिहासातील टर्निंग पॉईंट ठरला. बार्सिलोना आणि नेदरलँड्सचे महान स्ट्रायकर राहिलेल्या क्लुइव्हर्ट, यांच्या आई क्युरासाओच्या होत्या. २०१५ मध्ये जेव्हा क्लुइव्हर्ट यांनी क्युरासाओ संघाचे प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळली, तेव्हा त्यांनी युरोपभर फिरून क्युरासाओ वंशाच्या खेळाडूंना एकत्र केले आणि या छोट्या संघाला व्यावसायिक शिस्त लावून एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील लढवय्या संघात रूपांतरित केले.
Fifa World Cup : चोरांचा इंग्लंडच्या ट्रेनिंग किटवर डल्ला... खेळाडूंचा सराव सुरू होण्यापूर्वी व्हॅनमधून सामान पळवले, फक्त एक चेंडू ठेवला...या संघआने क्युरासाओने केवळ वर्ल्ड कपमध्येच नव्हे, तर उत्तर अमेरिकन देशांच्या CONCACAF स्पर्धेत आणि 'कॅरेबियन कप'मध्ये अनेक मोठ्या संघांना पाणी पाजले आहे. त्यांनी फुटबॉल जगतात आपली ओळख 'द ब्लू लायन्स' अशी निर्माण केली आहे. काल जेव्हा हा संघ चारवेळच्या विजेत्या जर्मनीविरुद्ध मैदानावर उतरला, तेव्हा साऱ्यांना निकाल आधीच माहित होता. त्यामुळे क्युरासाओ संघाकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे त्यांनी केलेला हा गोल चर्चेत राहिला. जर्मनीकडून फेलिक्स नमेचा ( ६ मि.), निको श्कोटेरबेक ( ३८ मि.), काय हाव्हेर्ट ( ४५+५ मि. व ८८ मि.), जमाल मुसिआला ( ४७ मि.), नॅथेनिएल ब्राऊन ( ६८ मि.), डेनिझ उनडाव्ह ( ७८ मि.) यांनी गोल केले.