Solapur: कडक उन्हात तीव्रतेत मंगळवेढ्यात शाळाप्रवेशाची तयारी
esakal June 15, 2026 12:45 PM

हुकूम मुलाणी

मंगळवेढा: गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या कडक झळामुळे उन्हाळी सुट्टीमुळे न भरलेली शाळा उद्यापासून सुरू होत असल्या तरी अजूनही तालुक्यात मान्सून पावसाचे आगमन न झाल्यामुळे कडक उन्हात उद्या शाळेत प्रवेशोत्सावाचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा तसा अधिक उष्ण ठरला. जूनच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात पावसाची नेहमी सुरुवात होती परंतु अद्याप पावसाने दडी मारल्याने उन्हाच्या तीव्रता तशाच आहेत.

काही शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे अशा परिस्थितीत जूनच्या उन्हात शाळा भरत असल्यामुळे पालकांमधून चिंता व्यक्त केली जात असली तरी शाळा प्रवेशाच्या निमित्ताने उद्या ढवळस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळातून उद्याच्या प्रवेशासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लेझीम, हलगी, ग्रामीण भागातील वाद्याची तयारी करण्यात आली.

स्वागतासाठी स्वागत गीते गुलाब पुष्प प्रभात फेरी त्याचबरोबर खाऊ वाटपाचे नियोजन केले प्रवेशाच्या निमित्ताने स्थानिक आमदार समाधान आवताडे पंचायत समिती सभापती दिपाली ताड जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर करुणा शिवशरण संगीता दुधाळ रमेश भांजे उपसभापती अर्जुन मल्लाळे याशिवाय पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष सुनंदा अवताडे व खा.

प्रणिती शिंदे यांच्यासह स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालक यांना देखील आमंत्रित करण्यात आले. तालुक्यातील 250 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 44 हजार 495 इतक्या पुस्तकाची मागणी करण्यात आली होती 1 लाख 24 हजार 371 पुस्तके प्राप्त झाली. सहावीचा अभ्यासक्रम बदलणार असल्यामुळे ती पुस्तके अजून प्राप्त झालेल्या भविष्यात आणखीन मागणीप्रमाणे पुस्तक मिळणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.