Nanded: बावीस नाल्यांचे सांडपाणी नदीत; प्रक्रिया करून सोडणार; गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल
esakal June 15, 2026 12:45 PM

नांदेड: शहराच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांना यश येऊ लागले असून शहरातील २२ प्रमुख नाल्यांमधून थेट नदीत मिसळणारे सांडपाणी पूर्णपणे रोखण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. अमृत २.० योजना आणि राज्य नदी संवर्धन अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या मलनिःस्सारण व मलशुद्धीकरण यंत्रणेमुळे आता सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच ते नदीत सोडले जात आहे.

त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी गुणवत्तेमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील विविध भागांमधून नाल्यांद्वारे सांडपाणी थेट गोदावरी नदीत मिसळत होते. त्यामुळे नदी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत आणि राज्य नदी संवर्धन कार्यक्रमातून नदी प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला.

खासदारकीसाठी TMC बंडखोरांनी निवडला त्रिपुरातला लहान पक्ष, फक्त नावाला अस्तित्वात; दोन वर्षांपूर्वी NCPIची स्थापना

त्यानुसार शहराच्या उत्तर भागातील १७ आणि दक्षिण भागातील ५ अशा एकूण २२ नाल्यांचे पाणी थेट नदीत जाण्याऐवजी मलशुद्धीकरण केंद्रांकडे वळविण्याची व्यवस्था करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत नदीकाठालगत सुमारे ३.३ किलोमीटर लांबीची मोठी मलवाहिनी उभारण्यात आली आहे. याशिवाय विविध ठिकाणी सांडपाणी उपसा केंद्रे आणि मलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. चुनाल नाला, बंदाघाट परिसर तसेच जुना पूल परिसरातील यंत्रणांद्वारे सांडपाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जात आहे.

त्यामुळे अशुद्ध पाणी थेट नदीत मिसळण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. विशेष म्हणजे पूर्वी गोदावरी नदीच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरल्याचे चित्र दिसत होते. मात्र सांडपाण्याचा प्रवाह रोखण्यात आल्याने आणि नदीतील प्रदूषण कमी झाल्याने जलपर्णीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे नदीपात्र अधिक स्वच्छ आणि मोकळे दिसू लागले आहे.गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त नीलेश सुकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता आणखी उपाययोजना राबविणार

महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पामुळे नदी संवर्धनाला चालना मिळाली असून भविष्यात गोदावरी नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवण्यासाठी आणखी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वीच प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.