Akola: मुख्य चौकातील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; नाल्याही तुंबल्या, साफसफाईकडे दुर्लक्ष ;मलकापूर परिसरातील परिस्थिती
esakal June 15, 2026 01:45 PM

अकोला: महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ अंतर्गत येणाऱ्या मलकापूर परिसरातील नागरिकांना सध्या दुहेरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुख्य चौकात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत असताना दुसरीकडे मुख्य नाल्याही घाणीने तुंबल्या आहेत.

मलकापूर येथील मुख्य चौकातून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने तसेच शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी आणि चौकातील विविध ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

Pune Ring Road: पुणे परिसरातील ११७ गावांसाठी मोठी बातमी! सरकारच्या निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा, रिंगरोडलाही मिळणार वेग

विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाच्या काळात हे खड्डे अपघातांना निमंत्रण देण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

वृद्ध नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनाही रस्ता ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मलकापूर परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, प्लास्टिक कचरा साचला असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होत आहे.

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल नालेसफाईची कामे कधी?

पावसाळा तोंडावर आला असतानाही नालेसफाईची कामे सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यासाठी महानगरपालिकेकडून सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये साफसफाईची कामे सुरू झालेली नाहीत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.